आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञानचा कट अाॅफ दुसऱ्या यादीत ९२%, अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी अाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या गुणवत्ता यादीने यंदा प्रथमच उच्चांक गाठल्याने या यादीत स्थान मिळू शकलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे लक्ष दुसऱ्या गुणवत्ता यादीकडे लागून राहिले होते. सोमवारी (दि. २७ जून) अकरावी प्रवेशासाठी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर झाली. विशेष म्हणजे, दुसऱ्या गुणवत्ता यादीने मागील वर्षीचा उच्चांक मोडत नवा उच्चांक गाठला आहे. पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत विज्ञान शाखेसाठी दुसरी यादी अवघी दीड टक्क्याने कमी झाली आहे. विज्ञानचा कट ऑफ ९२.६६ टक्के, तर वाणिज्यचा कट ऑफही ८३ टक्क्यांवर लागला आहे. विद्यार्थ्यांचा ओढा शहरातील प्रमुख महाविद्यालयांतच असल्याने इतर महाविद्यालयांतील कट ऑफ तुलनेने कमी आहे.
अकरावीच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा (एचएससी व्होकेशनल) या शाखांसाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत २० ते २१ हजार जागा आहेत. त्यासाठी तब्बल ४० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. पहिल्या गुणवत्ता यादीत हजारांवर प्रवेश झाले. सोमवारी दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत राहणार आहे. तसेच, मंगळवारी (दि. २८) तिसरी यादीही जाहीर होणार असून, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेला वेग येईल.

कला शाखेचे प्रवेश खुले
दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता वाढल्याने विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि वाणिज्य या शाखांकडे सर्वाधिक असल्याचे गुणवत्ता यादीतील कट ऑफवरून दिसून येते. पहिल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतर शहरातील सर्वच महाविद्यालयांत कला शाखेचे प्रवेश सर्वांसाठी खुले झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...