आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावीचे १०४१६ प्रवेश झाले निश्चित, प्रमुख कॉलेजात विद्यार्थ्यांची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाच्या उपलब्ध असलेल्या २० हजार ८६० जागांपैकी निम्मा जागांवर म्हणजेच दहा हजार ४१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. अकरावीसाठी शहरातील प्रमुख महाविद्यालयांत तब्बल ४२ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याने पहिली दुसरी गुणवत्ता यादीने उच्चांक गाठला. त्यामुळे आता तिसऱ्या गुणवत्ता यादीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले असून सोमवार दि. २९ रोजी ही यादी जाहीर होणार आहे.
अकरावी प्रवेशासाठीच्या पहिली दुसरी गुणवत्ता यादीनंतर शहरातील ५१ महाविद्यालयांत सात हजार ६८० प्रवेश निश्चित झाले आहेत. दुसऱ्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू असून सोमवारी ही प्रवेशप्रक्रिया सुरू राहिला. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचेही प्रवेश निश्चित झाले आहे. पहिल्या दोन्ही याद्यांमध्ये प्रवेशासाठी स्थान मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांचे आता तिसऱ्या गुणवत्ता यादीकडे लक्ष लागले आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, केटीएचएमची यादी जाहिर...
बातम्या आणखी आहेत...