आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल सुधारगृहातून पळाली 12 मुले, चादरींचा दोर करून पार केली 16 फुटी भिंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशकातील किशोर बाल सुधारगृहाच्‍या रिमांड होममधून 12 मुले पळाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शौचास जातो असे सांगून ही मुले खोलीतून बाहेर पडली होती. ती पुन्‍हा परतली नाहीत. चादरींचा दोर तयार करून त्‍याआधारे ही मुले पळून केल्‍याचे उघड झाले आहे.
बाल सुधारगृहाच्या तब्‍बल 16 फुट उंच भिंतीवरुन उडी मारून ही मुले पळाली आहेत. मुलांमध्ये पुण्याचे 6 मुले, साताऱ्याचे 4 आणि मुंबईचे 2 जण आहेत. या 12 मुलांनी पहाटेच पळ काढल्‍याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नाशिकचे सरकारवाडा पोलिस मुलांचा शोध घेत आहेत. एक- दोन नव्‍हे तर तब्बल 12 मुलांनी प्रशासनाच्‍या डोळ्यात धुळ फेकून पळ काढल्‍याने बालसुधार गृहाच्‍या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्‍हा समोर आला आहे. याआधीही असे प्रकार येथे घडले आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा, मुलांवर काय होते गुन्‍हे...
बातम्या आणखी आहेत...