आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तिरस: नाशकात नवकार मंत्र 120 तास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘णमो अरिहंताणं, णमो सिद्धाणं..’ हा नवकार महामंत्र सलग 120 तास (तब्बल पाच दिवस) करण्याच्या संकल्पाची पूर्ती मंगळवारी सकाळी मोठय़ा सोहळ्याद्वारे करण्यात येणार आहे. भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी सकाळी नवकार गायनाचा समारोप रविवार कारंजा परिसरात जैन संघटनेच्या वतीने केला जाणार आहे.

जैन इंटरनॅशनल वुमन्स ऑर्गनायझेशन, जैन सोशल ग्रुप ग्रेपसिटी, मरुधर जैन मंडळ, मारवाडी युवा मंच या संस्थांच्या माध्यमातून गुरुवारी सकाळी नवकार महामंत्र गायनाचा प्रारंभ करण्यात आला होता. तेव्हापासून सतत पाच दिवस जैन समाजातील शेकडो महिला आणि मान्यवरांनी या अखंड गायनाच्या विश्वविक्रमी संकल्पात सहभाग नोंदविला. सोमवारी सकाळी प. पू. राजहंसजी म. सा., प. पू. र्शी मयंकसागरजी महाराज, प. पू. उपप्रवर्तक र्शृतमुनीजी म. सा. यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा होणार आहे. जैन संघटनेचे पारस लोहाडे आणि भूषण संचेती यांनी या उपक्रमासाठी पर्शिम घेतले. कार्यक्रमस्थळी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला असून, त्यात पाचही दिवसांचे रेकॉर्डींग करण्यात आले आहे. पाचव्या दिवशी संबंधित गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डशी निगडित पथक घटनास्थळी हजर होणार असून त्या वेळी रेकॉर्डच्या अधिकृतपणावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.

भगवान महावीर यांच्या भव्य पेन्सिल चित्राची निर्मिती
भगवान महावीर जयंतीनिमित्त त्यांच्या 10 फूट बाय 9 फूट इतक्या भव्य स्वरूपातील पेन्सिल चित्राचे काम प्रख्यात कलाकार अशोक नागपुरे यांच्यासह निकिता भन्साळी आणि पारस लोहाडे यांच्याकडून साकारले जात आहे. त्या चित्राची पूर्ततादेखील करण्यात येणार आहे. या चित्राचेदेखील विश्वविक्रम होणार असल्याचा दावा आयोजकांतर्फे करण्यात आला आहे. या विक्रमांच्या परीक्षणासाठी लिम्कातर्फे मूर्ती आणि अमेझिंग वर्ल्ड रेकॉर्डचे पावन सोलंकी आज उपस्थित राहणार आहेत.