आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२० रुपये किलोची ‘सरकारी’ तूरडाळ बाजारातून दूरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिवसेनेच्या मंत्र्यांनी सरकारवर दबाव वाढविल्यानंतर बुधवार (दि. ४)पासून तूरडाळ १२० रुपये प्रतिकलो दराने विक्रीचे आदेश सरकारने दिले असले, तरी शहरात कुठेच या भावाने डाळीची विक्री झाली नाही. मुळात छाप्यांतून जप्त झालेली तूरडाळ किंवा आयात तूरडाळ बाजारात पोहोचत नाही, तोपर्यंत दरवाढीचे दुष्टचक्र भेदणे अवघड असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे डाळींच्या दरवाढीमुळे दररोजच्या जेवणातील वरण-भातासोबतच उडदाचे पापडही किलोमागे पन्नास ते साठ रुपयांनी महागले आहेत.

अल्प पाऊस डाळींचे त्यामुळेच घटलेले उत्पन्न यामुळे गत महिन्यात तूरडाळीचे भाव थेट सव्वादोनशे रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यामुळे सर्वसामान्यांत प्रचंड संताप पाहायला मिळत होता. सरकारने साठवणूबाजांना चाप लावत छापेसत्र सुरू केले. त्यानंतर मात्र डाळीचे भाव १७० रुपयांपर्यंत खाली आले. सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने तूरडाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला भाग पाडले असून, १२० रुपये किलोने तूरडाळ बुधवारपासून विक्रीचे आदेश दिले आहेत. मात्र, महागड्या दरात डाळीची खरेदी केल्याने ती सरकारने जाहीर केलेल्या दरात कशी विक्री करणार, असा प्रश्न व्यापाऱ्यांपुढे असल्याने आहे त्याच दरात शहरात बुधवारी तूरडाळीची विक्री झाली आणि दिवाळीत सामान्यांना दरवाढीबाबत काही दिलासा मिळेल, याची आशाही धूसर झाली आहे.

उडीदडाळीच्यादरवाढीचाही फटका : तूरडाळीप्रमाणेच उडीदडाळीचेही भाव किलोमागे ५०-६० रुपयांनी तेजीत आहेत. त्याचा परिणाम या डाळीपासून बनविल्या जाणाऱ्या पापडांच्या भावावरही झाला आहे. उडदाच्या पापडाचेही भाव किलोमागे ६० रुपयांपर्यंत महागले असून, केवळ स्वयंपाकघरातील बजेटमध्येच नाही, तर रेस्टॉरंट्समध्येही पापडाचे दर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आयात डाळीला मागणी कमी
आयाततूरडाळ चोपडी असते. तिला शिजायलाही वेळ लागतो, चवही नसते. त्यामुळे आयात डाळीला मागणीही कमी असते. दुसरीकडे स्थानिक तूरडाळीला मात्र चांगली मागणी असते.

दर कसे कमी होणार?
व्यापाऱ्यांनी जास्त दराने डाळ खरेदी केलेली असल्याने ते कमी दरात डाळीची विक्री करण्याबाबत साशंक आहेत. जप्त आयात डाळही बाजारात नसल्याने दर कमी कसे होणार? राहुलडागा, संचालक, डागा अॅण्ड ब्रदर्स
बातम्या आणखी आहेत...