आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालात 4.23 टक्क्यांनी वाढ, यंदाही मुलांपेक्षा मुलीच हुशार; नाशिक विभाग तळातून दुसरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्यमाध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल ८८.२२ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ४.२३ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८५.११ तर मुलींची ९२.३८ आहे. मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७.२१ टक्के जास्त आहे. गेल्या पाच वर्षांत नाशिक विभागाचा निकाल ९.२१ टक्क्यांनी वाढला आहे. राज्यातील नऊ विभागांच्या तुलनेत नाशिक विभागाचा क्रमांक तळातून दुसरा आहे. सर्वात कमी मुंबई विभागाचा निकाल ८८.२१ टक्केअाहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सलग सहाव्या वर्षी सर्वाधिक म्हणजेच ९५.२० टक्के लागला आहे. मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र गोधने यांनी ही माहिती दिली. मंगळवारी (दि. ३०) ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर झाला. विभागात ९५२ कनिष्ठ महाविद्यालयांतील एक लाख लाख ५९ हजार ३३७ विद्यार्थी प्रविष्ट होते. २१८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. एक लाख ४० हजार ५७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १८ हजार ७६२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. नाशिकमध्ये ७० हजार ९९ विद्यार्थी प्रविष्ट होते, त्यातील ६१ हजार ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, जिल्ह्याचा निकाल विभागात सर्वात कमी म्हणजेच ८७.०९ टक्के लागला आहेत. 

११ जुलैपासून पुरवणी परीक्षा
दहावी बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी शिक्षण मंडळातर्फे जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाईल. जुलैमध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सोमवार दि. जूनपासून ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्रे सादर करावयाची आहेत. परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. 

जूनला गुणपत्रिका 
निकालाची मूळ प्रत जूनला दुपारी वाजता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांत मिळेल. त्यानंतर प्रवेशप्रक्रिया सुरु होईल. ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासूनच गुणपडताळणी छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा आहे. त्यासाठी आवश्यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह बुधवार दि. ३१ मे ते जून जूनपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज करता येईल. छायांकित प्रतीसाठी १९ जूनपर्यंत विहित शुल्क भरून अर्ज करता येईल. 

जिल्हानिहाय निकाल 
नाशिक : ८७.०९ 
धुळे : ९०. ८९ 
जळगाव : ८७.६२ 
नंदुरबार : ९१.०५ 
एकूण : ८८. २२ 
बातम्या आणखी आहेत...