आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१४ जणांनी स्वयंस्फूर्त नाकारले गॅस अनुदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गरिबांना कमी दरात गॅस सिलिंडर उपलब्ध होण्यासाठी बाजारभावानुसार सिलिंडरची खरेदी करण्याची क्षमता असलेल्या नाशिकमधील १४ ग्राहकांनी स्वच्छेने गॅस सिलिंडरची सबसिडी नाकारली. सिटी सेंटर मॉल येथे भारत पेट्रोलियम कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या भारत मेळाव्यास भेट देत सबसिडी नको असल्याचे अर्जही त्यांनी भरून दिले आहेत.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने ग्राहकांमध्ये जागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गतच भारत मेळा आयोजित केला आहे. ग्राहक जागृती सप्ताह जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. मेळाव्यास गुरुवारी सायंकाळपर्यंत जवळपास २०० पेक्षा अधिक ग्राहकांनी भेट दिली. त्यातील चिकित्सक ग्राहकांना लकी-ड्रॉ कुपन्स देण्यात आले. आठ दिवस नियमित एक लकी ड्रॉ काढला जाणार आहे. शिवाय शेवटच्या दिवशीही मेघा लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, विजेत्यांना विविध प्रकारची बक्षिसेही दिली जाणार आहेत.
त्याचबरोबर भेट देणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांचे नंबर आणि मोबाइल नंबर कंपनीकडे दिले जाणार असून, त्यांनी बीपीसीएलच्या पेट्रोलपंपावर इंधन भरल्यानंतर लागलीच त्यांना किती इंधन भरले, याचीही माहिती एसएमएसद्वारे मिळेल. त्यामुळे इंधनातील चोरीपासून ग्राहकांची सुटका होणार असल्याचेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
असे राबविले जाणार विविध उपक्रम

- गुरुवारी (दि. २८) : ते नेत्र तपासणी
- शुक्रवारी (२९मे) : दंत चिकित्सा शिबिर
- शनिवारी (30मे) :चित्रकला स्पर्धा (६ वर्षांपर्यंत, ते १२ वर्षे अशी दोन गटांत होणार) गायन स्पर्धा
- रविवारी(3१ मे) :रक्तदान शिबिर, गायन स्पर्धा.
- १ जून रोजी गायन स्पर्धा (अंतिमफेरी),
- २ जून रोजी होणार कार्यक्रमाची सांगता.
अनेकांनी केली आरोग्य तपासणी
बुधवारी (दि. २७) प्रथमच वोक्हार्टच्या समन्वयाने दुपारी ते वाजेदम्यान आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये ३० पेक्षा अधिक जणांनी आरोग्याची तपासणी केली.
बातम्या आणखी आहेत...