आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१४ हजार चौरस मीटरचा टीडीआर बाजारात खुला, रखडलेल्या प्रकरणांना आयुक्तांकडून गती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील टीडीआरची कृत्रिम टंचाई दूर होण्यासाठी पुन्हा एकदा मदत होणार असून, गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या जवळपास नऊ टीडीआरच्या फायली आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम सहसंचालक विनय शेंडे यांनी निकाली काढल्या आहेत. सहा प्रकरणांतून जवळपास १४ हजार ६०० चौरस मीटरचा टीडीआर मोकळा झाला असून, धारकाला आता कोणालाही मर्जीप्रमाणे तो विकण्याची मुभा असेल.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे विकास आराखड्यातील आरक्षणे संपादित करणे अशक्यप्राय ठरत आहे. दुसरीकडे महत्त्वाच्या नागरी कामांसाठी आरक्षणे संपादित करणे गरजेची बाब असल्याचे लक्षात घेऊन इच्छुक जमीनमालकांच्या टीडीआरच्या फायली निकाली काढण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. यात ज्यांना टीडीआर गरजेचा आहे, अशांच्या फायली निकाली काढल्या जात आहेत.
यापूर्वी आयुक्तांनी टीडीआरच्या बहुतांश फायली निकाली काढल्यामुळे जवळपास २४ हजार चौरस मीटरचा टीडीआर बाजारात आला होता. तसेच, २६ हजार चौरस मीटर टीडीआर देण्याचा इरादाही व्यक्त केला होता. मोठ्या प्रमाणात टीडीआर बाजारात आल्यामुळे विशिष्ट व्यक्तींकडील साठेबाजी संबंधितांची मक्तेदारी मोडीत निघेल, अशी आशा यामुळे निर्माण झाली होती. प्रत्यक्षात सिंहस्थ कुंभमेळा अन्य कामांमध्ये आयुक्त व्यस्त झाल्यामुळे पुन्हा टीडीआरच्या प्रकरणांना ब्रेक लागला होता. त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती. तसेच, टीडीआर लॉबीच्या दबावात प्रकरणे रखडल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी या प्रकरणाच्या फायली निकाली काढल्या.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, बांधकाम परवानगीसंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक...
बातम्या आणखी आहेत...