आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1476 शाळाबाह्य मुलांना दिली शिक्षणाची ‘दिशा’, महापालिका व दिशा फाउंडेशनचा वर्षभर उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या दिशा प्रतिष्ठानच्या सहकार्याने मनपाच्या शिक्षकांनी गेल्या वर्षभरात १४७६ शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अाणले अाहे. यासाठी वर्षभरापासून याेगदान देणाऱ्या महापालिकेच्या २४ मुख्याध्यापक अाणि शिक्षक-विद्यार्थ्यांसह तीन केंद्रप्रमुखांचा प्रतिष्ठानच्या वतीने गुरूदक्षिणा कार्यक्रमांतर्गत गाैरव करण्यात अाला. 
 
शहरातील व्यावसायिक महिला गृहिणीनी एकत्र येऊन सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी दिशा प्रतिष्ठान ही संस्था सुरू केली अाहे. समाजातील कुठल्याही विशिष्ट समस्येवर मात करण्यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न करणे हे संस्थेचे ध्येय उद्दिष्ट अाहे. याच उद्दिष्टाने संस्थेने वर्षभरापासून पालिकेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांच्या मदतीने सूत्रबद्ध कार्यक्रम राबविला. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गाेडी लागावी यासाठी त्यांच्या पालकांना भेटून शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात अाले. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांना इंग्रजीची गाेडी लागावी, तसेच त्यांनी नियमित शाळेत यावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात अाले. यात शाळाबाह्य मुलांचा शाेध घेणे, यासाठी प्रत्यक्ष संपर्कावर जाेर देऊन मुलांच्या गरजा काेणत्या, त्यांची अार्थिक परिस्थिती अादींचा अभ्यास करून त्यांना त्या दृष्टीने मदत करण्यात अाली. 

यासाठी प्रगती चांगली असलेल्या शाळा तशाच ठेवून पटसंख्या कमी असलेल्या शाळांची पटसंख्या वाढविली, तर पटसंख्या शून्य असलेल्या शाळांची ही संख्या सर्वाधिक करण्यावर भर दिला.यासाठी शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांच्यासह केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक शिक्षकांचेही माेलाचे याेगदान लाभले. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शिल्पा पारख सचिव साेनम टाटिया यांच्यासह उपाध्यक्षा संगीता बेदमुथा, खजिनदार अारती नहार, सहसचिव दर्शना सराफ, समता सुराणा, दर्शनी अंबेकर अादींनी यासाठी पुढाकार घेतला. 
 
गुणवत्ता उत्तम 
काेणत्याही व्यावसायिक मार्गदर्शनाशिवाय या मुलांनी सादर केलेले कार्यक्रम अभिनंदनीय अाहेत. त्यांची गुणवत्ता पाहता खासगी शाळांच्या तुलनेत महापालिकेच्या शाळा काेणत्याही बाबतीत कमी नाहीत. 
- अभिषेक कृष्णा, मनपा अायुक्त 
 
नितीन उपासनी ‘बेेस्ट शिक्षणाधिकारी’ 
हाउपक्रम यशस्वी करण्यासाठी कायम तत्पर असलेले महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांचा यावेळी मनपा अायुक्तांच्या हस्ते ‘बेस्ट शिक्षणाधिकारी’ म्हणून गाैरव करण्यात अाला. 
 
गुरूदक्षिणा कार्यक्रमात शिक्षकांचा गाैरव 
प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात ‘गुरू दक्षिणा’ कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. या कार्यक्रमात महापालिकेच्या १२७ शाळांमधून सुमारे ७०० विद्यार्थी सहभागी झाले हाेते. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रतिष्ठानच्या वतीने २४ मुख्याध्यापक, २४ शिक्षक, २४ अादर्श विद्यार्थी तीन केंद्रप्रमुखांचा पुरस्कार देऊन गाैरव करण्यात अाला. 
बातम्या आणखी आहेत...