आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ मिनिटांत लाखांच्या मोबाइलची चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थकाळात शहरात खुनांचे सत्र सुरू असताना आता भरवस्तीमध्ये तीन जणांच्या टोळीने मोबाइलचे शाेरूम फोडून अवघ्या १५ मिनिटांत सुमारे अाठ लाख रुपयांचे माेबाइल दूरध्वनी संच लांबवल्याची घटना घडली अाहे. पंडित कॉलनीत गुरुवारी पहाटे ४.४५ वाजेच्या सुमारास ही धाडसी चोरी झाली. संशयित सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने तपास करताना अडचण येणार नसली तरीही हा गुन्हा पोलिसांना आव्हान देणारा ठरला आहे. भरवस्तीमध्ये घरफोडीचा प्रकार घडल्याने पोलिसांची गस्त कुचकामी ठरत आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू अाहे.
पाेलिसांनी लेल्या माहितीनुसार पंडित कॉलनी परिसरातील ‘अाेशियान’ या माेबाइल शाेरूमचे मालक परेश राका यांना सकाळी वाजता येथील व्यावसायिक संकुलाचे मालक आहुजा यांनी दुकानात चोरी झाल्याची कल्पना दिली. राका यांनी तत्काळ दुकानात जाऊन पाहणी केली. दुकानातील विविध कंपनीचे १५६ मोबाइल चोरी झाल्याचे उघडकीस आले. एका मोबाइलची किंमत सुमारे २० हजार रुपयांच्या वर असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व महागड्या मोबाइलवर चोरट्यांनी हात साफ केला. दीड ते दोन हजारांच्या मोबाइलला त्यांनी हातही लावला नाही. चोरट्यांनी दुकानाचा गल्ला फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. पंधरा मिनिटांत मोबाइल चोरी केल्याचे राका यांनी पोलिसांना सांगितले. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत सोमवंशी, गोपाळ कोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्हीवरील फुटेज ताब्यात घेतले. पाेलिसांच्या दोन पथकांकडून तपास सुरू केल्याचे सोमवंशी यांनी सांगितले. संशयितांची चोरी करण्याची पध्दत ही सराईत गुन्हेगारासारखी नसल्याने चोरी करताना सीसीटीव्हीमध्ये ते कैद झाले आहेत. लवकरच सर्व संशयित अटकेत असतील, असा विश्वास निरीक्षक सोमवंशी यांनी व्यक्त केला.

चोरीनंतरबदलले कपडे.. : चोरीझाल्यानंतर एका संशयिताने अंगातील शर्ट काढून दुसरा परिधान केल्याचे दिसते. काम फत्ते झाल्यानंतर मोबाइलवर बोलताना दिसत आहे.

महागड्या मोबाइलवर हात साफ...
अाेशियानया माेबाइल संच विक्रीच्या शाेरूममधील सॅमसंग, एचटीसी, ओपो, सोनी अशा अाघाडीच्या ब्रॅण्ड असलेल्या कंपनीचे १५६ मोबाइल संचांची चोरी करण्यात आली. यात एका मोबाइलची किंमत साधारण २० हजाराच्यावर आहे. मात्र, दाेन ते तीन हजार किमतीच्या मोबाइलला चाेरांनी हातही लावला नाही.

नवीन दुकाने लक्ष्य....
शहरातनवीन शोरूम फोडण्याच्या घटना जुन्या आहेत. अोशियान माेबाइल्स या दुकानाचे चार महिन्यांपूर्वीच उद‌्घाटन झाले होते. नुकताच व्यवसाय सुरू झाला होता.

सीसीटीव्हीमध्ये कैद...
तीनसंशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. दोघांनी शटर वाकवत आत प्रवेश केला. चोरी करताना दोघे स्पष्ट दिसत आहेत. तिसरा बाहेर सर्व हालचालींवर पाळत ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे.

परिसरातीलदुकाने फोडण्याचा प्रयत्न
संशयितांकडूनपरिसरातील अॅक्सेस म्युच्युअल फंडासह आणखी एक दुकान फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. मोठी रक्कम असल्याने संशयितांनी फंडचे कार्यालय फोडले. येथील सीसीटीव्हीमध्ये ते कैद झाले आहेत.
पंडित काॅलनीतील ‘अाेशियान माेबाइल्स’ हे शाेरूम गुरुवारी पहाटेच्या सुमारास तीन जणांच्या टाेळीने फाेडले.

सात वाजता घटना समजली...
दुकानफोडले असल्याचे काॅम्प्लेक्सच्या मालकांनी सकाळी वाजता कळविले. दुकानात येऊन पाहिले असता सर्व महागड्या मोबाइलचीच चाेरी झाल्याचे िदसले. परेशराका, दुकान मालक
पोलिसांकडूनसहकार्य पोलिसांनीवेळीच ये‌ऊन सर्व तपास केला. सीसीटीव्हीचे सर्व चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित लवकरच पकडले जातील, असा विश्वास आहे. - पूजाराका, दुकान मालक

संशयितलवकरच ताब्यात
^माेबाइलचाेरी प्रकरणातील संशयितांची काही माहिती हाती आली आहे. दोन पथकांकडून तपास सुरू आहे. लवकरच अटक केली जाईल. हेमंतसोमवंशी, वरिष्ठ निरीक्षक, सरकारवाडा पोलिस ठाणे पहाटे शाेरूममध्ये दाेघे जण चाेरी करत असताना शाेरूमच्या बाहेर उभा राहून तिसरा संशयित बाहेर टेहळणी करीत हाेता. या चाेराच्या दुसऱ्या साथीदारानेही महागडे माेबाइल संच गाेळा केले ताे पहिल्या चाेराजवळ अाल्याचे चित्रण. अाेशियान माेबाइल शाेरूमचे शटर वाकवून अात शिरलेला चाेर माेबाइल गाेळा करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.