आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमध्ये शस्त्रांद्वारे दहशत पसरविणार्‍या पंधरा जणांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत पोलिस यंत्रणेने हाती घेतलेल्या मोहिमेमुळे रहिवासी भागात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर काही प्रमाणात वचक बसला. परंतु, यंत्रणेची कारवाई थंडावल्याने टवाळखोर, भाईगिरी करणार्‍यांचा उपद्रव वाढल्याचे दिसून येत आहे. बुधवारी रात्री पोलिसांच्या गस्तीत तब्बल दहा टवाळखोरांना हातात तलवार, चाकू घेऊन दहशत पसरविताना ताब्यात घेण्यात आले.

काही दिवसांपासून शहर व परिसरात गुंड, गुन्हेगारांचा आणि टवाळखोरांचा उपद्रव वाढत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यातही पोलिस यंत्रणेच्या कोब्मिंग ऑपरेशन, ऑल आउटसारख्या मोहिमाही थंडावल्याने तडीपार गुंडांचा शहरात वावरही वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रत्येक पोलिस ठाण्यात अधिकार्‍यांनी सराईत गुन्हेगारांची शोधमोहीम राबविली. यामध्ये एक, दोन नव्हे तर तब्बल दहा ठिकाणी धारदार शस्त्र घेऊन परिसरात दहशत माजविणार्‍यांना ताब्यात घेण्यात आले.

सातपूर, उपनगरला कारवाई : सातपूरच्या र्शमिकनगर येथे संशयित धनराज सोनवणे याने तलवार बाळगल्याप्रकरणी, या भागातील आनंदसागर सोसायटीत राहणार्‍या अक्षय पाटील, सावरकरनगर भागातील अंकित शिवभूषण सिंग व आनंदवल्ली भागातील रवींद्र अर्जुन गायकवाड याने चाकू घेऊन चांदशी पुलाजवळ धिंगाणा घातल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी अटक केली. उपनगर व नाशिकरोड भागातही चार जणांना धारदार शस्त्र बाळगल्याप्रकरणी व भद्रकाली पोलिसांनी विनोद फलटणे याने दूधबाजार येथे तलवार घेऊन गोंधळ घातल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.

एकाच रात्रीत केली कारवाई
आयुक्तालय हद्दीत एकाच वेळी हत्यारे बाळगणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या शोधमोहिमेत 100हून अधिक आरोपींच्या घराची झडती घेतली असता 15 सराईत गुन्हेगारांकडे धारदार चाकू, तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
-पंकज डहाणे, सहायक आयुक्त