आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ विद्यार्थ्यांची इन्फोसिसने केली कॅम्पस इंटरव्ह्यूत निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - इन्फोसिस या प्रख्यात आयटी कंपनीतर्फे शहरातील काही प्रमुख महाविद्यालयांत कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू आहेत. एचपीटी आर्टस् आणि आरवायके सायन्स महाविद्यालयात मंगलवारी झालेल्या मुलाखतींमध्ये १५ जणांची पुण्यातील इन्फोसिस कंपनीसाठी निवड झाली.

निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीस प्रशिक्षण दिले जाणार असून, यानंतर त्यांना पुढील कामांची वाटणी करून दिली जाणार आहे. मंगळवारी (दि. २०) एचपीटीच्या सेमिनार हॉलमध्ये ह्या मुलाखती झाल्या. निवड झालेल्यांना दीड लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे. मुलाखतींसाठी ५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १५ विद्यार्थ्यांची निवड झाली. होतकरू विद्यार्थ्यांचा शोध कंपनीकडून सुरू होता असे मुलाखत घेणाऱ्यांनी सांगितले.