आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन-साेने खरेदीला उधाण; लक्ष्मीपूजनासह दीपाेत्सवातील मुहूर्तांवर दीडशे काेटींची उलाढाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि. १९) नाशिककरांनी मनपसंत खरेदी केल्याने दिवसभरात जवळपास शंभर काेटींवर, तर दीपाेत्सवात दीडशे काेटींवर उलाढाल झाल्याचा अंदाज अाहे. यावर्षी पडलेला चांगला पाऊस, एकाच महिन्यात बहुतांश कर्मचाऱ्यांना मिळालेले वेतन अाणि बाेनस याचा सकारात्मक परिणाम विक्री वाढण्यात झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
 
लक्ष्मीपूजनासह दिवाळीतील विविध मुहूर्तांवर जवळपास ७५० कार, तर तीन हजार माेटारसायकल्सची डिलिव्हरी वितरकांनी दिली. काही प्रमुख कार कंपन्यांकडे काही माॅडेल्सला वेटिंग असल्याने अनेकांना मुहूर्तावर केवळ बुकिंग साधता अाली. साेने विक्रीलाही या मुहूर्तावर झळाळी मिळाली. तर रिअल इस्टेटलाही गती मिळू लागल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. 
 
वाहन वितरकांची शाेरूम्स दिवसभर गर्दीने फुलून गेली हाेती. सराफी पेढ्यांतील उत्साह अक्षरश: अाेसंडून वाहताना पहायला मिळाला, दहा ग्रॅमसाठी ३० हजार रुपयांच्या अात असलेले साेन्याचे भाव यामुळे ग्राहकांनी मनपसंत साेने खरेदी केली. रिअल इस्टेटमध्येही पुन्हा एकदा चांगले वातावरण असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. प्रधानमंत्री अावास याेजनेचा घेता येणारा लाभ अाणि ८.३५ टक्क्यांपर्यंत अालेले गृहकर्ज व्याजाचे दर यामुळे स्वप्नातील घर खरेदीकडे लाेक वळत अाहेत. त्याला मुहूर्ताची झालर मिळत अाहे. 
 
२०० कारची डिलिव्हरी 
लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा या दाेन्ही मुहूर्तांवर अाम्ही २०० कारची डिलिव्हरी देत अाहाेत. विजयादशमीचा मुहूर्त चांगला गेला, अाज अनेक माॅडेल्सला वेटिंग अाहे. दीपाेत्सवाच्या तिन्ही मुहूर्तांवर शहरातील वितरकांकडे मिळून ७५० च्या अासपास कारच्या डिलिव्हरीचा अंदाज अाहे. 
- राजेश कमाेद, सीअाेअाे, सेवा अाॅटाेमाेटिव्ह 
 
लक्ष्मी शिक्के, दागिन्यांना मागणी 
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दिवसभर लक्ष्मी मूर्ती, शिक्के यांसह दागिन्यांना चांगली मागणी हाेती. दहा ग्रॅमसाठी २९,५०० रुपयांच्या अासपास साेन्याचे दर हाेते. शुक्रवारच्या पाडव्याच्या मुहूर्तावर साेन्याचे वेढे, शिक्के, दागिने यांची, तर भाऊबिजेला माहेरवाशिणींची खरेदी पाहायला मिळेल. 
- मिलिंद दंडे, संचालक, दंडे ज्वेलर्स 
 
वाहन विक्री दालनांत प्रचंड गर्दी 
नवरात्राेत्सवापासूनचवाहनबाजारात चैतन्याचे वातावरण अाहे. दीपाेत्सवात धनत्रयाेदशीपासून लक्ष्मीपूजनापर्यंतच्या मुहूर्तांवर ग्राहकांची प्रचंड गर्दी कार अाणि माेटारसायकल वितरकांच्या दालनात दिसली. अनेक दालनांत नाेंदणी केलेल्या वाहनांची डिलिव्हरी घेण्यास ग्राहकांची गर्दी अाणि व्यस्त व्यवस्थापन असे चित्र गुरुवारी दिसले. लक्ष्मीपूजनासह दीपाेत्सवातील तिन्ही मुहूर्तांवर सर्व प्रमुख कंपन्यांच्या दालनांतून ७५० च्या अासपास कार तर तीन हजारच्या अासपास माेटारसायकल्सची डिलिव्हरी दिली गेल्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला. 
बातम्या आणखी आहेत...