आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 16 Thousand Students 11th Class Admission Confirmed

१६ हजार विद्यार्थ्यांचे ११ वी प्रवेश निश्चित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरावीची प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, अनुदानित विनाअनुदानित जागांवरील १६,३५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अनुदानित जागांवरील प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली असून, अाता विनाअनुदानित जागांवरील प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. या जागा भरल्यानंतर व्यवस्थापन कोट्यानुसार प्रवेश दिले जाणार आहेत.

अकरावीचा अभ्यासक्रम असलेले शहरात ५१ कॉलेज असून, त्यात कला, विज्ञान, वाणिज्य संयुक्त शाखेच्या २० हजार ८६० जागा आहेत. त्यातील अनुदानित जागांवर १५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. मात्र, गुणवत्ता यादीत स्थान मिळालेले हजारो विद्यार्थी आता विनाअनुदानित जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्नात अाहेत.

पर्यंतप्रवेश : विनाअनुदानितजागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरावे लागणार आहे. जुलैपर्यंत हे प्रवेश असून, त्यानंतर जुलैपर्यंत व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश होतील.