आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात मोकळ्या मैदानातील झुडपात सापडले 16 आठवड्याचे मृत अर्भक, परिसरात खळळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमध्‍ये चुंचाळे परिसरात गुरुवारी सकाळी अाठ वाजेच्या एक १६ अाठवड्यांचे मृत अर्भक माेकळ्या मैदानात अाढळल्यामुळे खळबळ उडाली अाहे. स्थानिक नागरिक शिवसेना नगरसेवक भागवत अाराेटे यांनी तक्रार केल्यानंतर संबंधित अर्भकाचे अवशेष जिल्हा शासकीय रुग्णालयात लिंगनिदानासाठी पाठवण्यात अाले अाहेत. दरम्यान, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने या ठिकाणी भेट देत परिसरातील दवाखान्यांची कसून तपासणी केली अाहे.

 

‘बेटी बचाव; बेटी पढाव’सारख्या उपक्रमातून एकीकडे राज्य शासन स्त्रीभ्रूण हत्या राेखण्यासाठी प्रयत्न करीत असताना वैद्यकीय क्षेत्राकडून त्यास काळिमा फासण्याचे प्रकार हाेत अाहे. १५ हजार रुपयांत गर्भलिंगनिदान करण्याचे राजराेस प्रकार उघडकीस येत असल्यामुळे नाशिक शहर स्त्रीभ्रूण हत्येबाबत बदनाम झाले अाहे. नुकतेच इनाेव्हा गाडीत गर्भलिंगनिदानासाठी साेनाेेग्राफी करण्याचे फिरते केंद्र उघडकीस अाल्यानंतर संबंधित शाकुंतल डायग्नाेस्टिकची नाेंदणी रद्द करून साेनाेग्राफी यंत्रालाही सील करण्यात अाले. तत्पूर्वी डाॅ. लहाडेंच्या प्रकरणामुळे कुंपणच शेत खात असल्यागत सरकारी दवाखान्यातील बेकायदेशीर गर्भपात किंबहुना स्त्रीभ्रूण हत्येवर प्रकाश पडला हाेता. मात्र, त्यानंतरही हे प्रकार सुरूच असल्याचे चित्र अाहे.


यामुळे चुंचाळे शिवारात दुपारी संजीवनगरमधील माेकळ्या मैदानात १६ अाठवड्यांचे अर्भक सापडल्यामुळे सारेच हादरले. येथील झुडपात एका प्लास्टिकच्या पिशवीत हे अर्भक हाेते. नागरिकांनी ही बाब नगरसेवक अाराेटे यांच्याशी संपर्क साधत पाेलिसांना कळवली. त्यानंतर पालिका वैद्यकीय विभागाच्या डाॅ. अारती चिरमाडे डाॅ. धनेश्वर यांनी या ठिकाणी भेट दिली. अर्भकाची पाहणी केल्यानंतर पुढील तपासणीसाठी पाेलिसांमार्फत जिल्हा रुग्णालयात अवशेष पाठवण्यात अाले. या ठिकाणी त्याचे शवविच्छेदन करून ते नेमके स्त्री की पुरुष जातीचे याबाबत निदान सुरू हाेते. गर्भलिंगनिदानातून हे अर्भकाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार घडल्याचा संशय अाहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुरेश जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी साधारण १६ अाठवड्यांपर्यंतचे अर्भक असू शकते असे प्राथमिकरित्या लक्षात अाले अाहे. मात्र, त्याचे लिंगनिदान करणे शक्य नाही. त्यामुळे शासनाच्या न्यायवैद्यकीय प्रयाेगशाळेत डीएनएचे नमुने तपासणीसाठी पाठवले अाहेत. त्याचा अहवाल अद्याप अाला नसून त्यानंतरच उलगडा हाेईल.

 

परिसरातील दवाखाने रडारवर : पालिकावैद्यकीय विभागाने परिसरातील दवाखाने खासकरून प्रसूतीगृहांची चाैकशी सुरू केली अाहे. या ठिकाणी काही बाेगस डाॅक्टर कार्यरत असल्याचाही संशय अाहे.


डीएनए तपासणीनंतरच उलगडा
चुंचाळेशिवारातील१६ अाठवड्याचे मृत अर्भक पाेलिसांनी शवविच्छेदनासाठी दिले. शवविच्छेदनात लिंगनिदान झाले नसून न्यायवैद्यकीय प्रयाेगशाळेत त्याबाबत अचूक निदानासाठी डीएनएचे नमुने पाठवले अाहेत. त्यानंतरच नेमके काय ताे उलगडा हाेईल.

- डाॅ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...