आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलादिनी विशेष माेहिमेत 1635 महिला मतदारांची नोंदणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महिला दिनानिमित्त जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने खास महिला मतदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेत एकाच दिवशी (दि. ८) तब्बल १६३५ महिलांची नव्याने नोंदणी झाली आहे. तर, ८३२ पुरुषांनीही मोहिमेचा फायदा घेतल्याने जिल्ह्यात २४६७ नवमतदारांची नोंदणी झाली आहे. 
 
मतदार नोंदणीत, मतदान करण्यात महिलांचे प्रमाण कमीच आहे. महिलांमध्ये मतदान आणि मतदार नोंदणीबाबत विशेष जागृती करण्याची अपेक्षा असल्याचे आयोगाच्या वतीने स्पष्ट करत नोंदणीचे आदेशही देण्यात आले. त्यानुसार ते १० मार्च हा कालावधी विशेष महिला मतदार नोंदणी सप्ताह म्हणून राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मार्च महिलादिनी संपूर्ण जिल्ह्यात महिलांची नोंदणी करण्यात आली. त्यात विविध ठिकाणी होणारे महिलांचे कार्यक्रम, महाविद्यालये, विविध कार्यालये, महिला महाविद्यालयांत ही विशेष मोहीम राबवित तेथे बीएलओंद्वारे या महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्यासाठी महिलांना नव्याने मतदार यादीत नाव नोंदणीची अर्ज देण्यात आले. शिवाय नावात बदल, पत्त्यात बदल यासह नाव वगळणीच्या अर्जांचेही येथे वाटप करण्यात आले. मोहिमेस जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून, मालेगाव अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात विशेष कार्यक्रमांचे आयोजनही झाले. 

शहरात सर्वाधिक नोंदणी नाशिक पूर्वमध्ये 
जिल्ह्यातझालेल्या महिला नवमतदार नोंदणीत सर्वाधिक १६८ नोंदणी बागलाणमध्ये झाली असून, अवघ्या १८ पुरुषांनीच नवीन नोंदणी केली. तर, नाशिक पूर्व मतदारसंघात २२७ पैकी १५० महिलांची नोंदणी आहे. नांदगावमध्ये ८९ पैकी ७४, मालेगाव मध्यला २०१ पैकी ११२, मालेगाव बाह्यमध्ये १४५ पैकी ७७, कळ‌वणमध्ये १८४ पैकी १३५, सुरगाण्यात पैकी ५, चांदवडमध्ये ८० पैकी ४१, देवळ्यात ३८ पैकी १९, येवल्यात १२१ पैकी ६४, सिन्नरमध्ये १८५ पैकी १२१, निफाडमध्ये १८५ पैकी ११५, पेठमध्ये ७५ पैकी ४८, नाशिकमध्ये २१३ पैकी १३७, पश्चिममध्ये १७३ पैकी १३८, देवळालीत १०३ पैकी ६२, इगतपुरीत ५७ पैकी ३०, त्र्यंबकेश्वरमध्ये ४३ पैकी ३८ अशी जिल्ह्यात २४६७ पैकी १६३५ महिलांनी नव्याने नोंदणीचे अर्ज सादर केले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...