आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 17 Lakh For Earthquack Measurment System ; Installing Nashik's Mery

भूकंपमापनासाठी 17 लाखांची यंत्रणा; नाशिकच्या मेरी येथे बसवणार अद्ययावत मशीन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लातूर आणि कोयना धरण परिसरानंतर आता नाशिकमध्ये भूकंपमापनासाठी अद्ययावत अशी 17 लाखांची यंत्रणा बसविण्यात येणार आहे. नाशिक महाराष्ट्र अभियंता संशोधन प्रबोधिनी (मेरी) येथे हे अत्याधुनिक डिजिटल यंत्र बसविण्यात येणार असून, याची लवकरच खरेदी करण्यात येणार आहे. हे यंत्र कार्यान्वित झाल्यानंतर शहर व जिल्हा परिसरातील भूकंपाचे योग्य मापन होणार असल्याचा विश्वास मेरीच्या अधिका-यांनी व्यक्त केला आहे.


राज्यात 35 ठिकाणी केंद्रे
नाशिक येथील मेरी कार्यालयात 1986 पासून भूकंपमापन विभाग कार्यरत आहे. येथे सद्य स्थितीत असलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून भूकंपाच्या तीव्रतेचे मोजमाप केले जाते. राज्यात अशा प्रकारचे 35 भूकंपमापन केंद्र आहेत. नवी यंत्रणा कार्यान्वित झाल्याने भूकंपाच्या तीव्रतेचे योग्य ते मोजमाप केले जाते.
आता संगणकावर मिळणार माहिती
सध्या उपलब्ध यंत्रणेच्या माध्यमातून कागदावर भूकंपाची तीव्रता नोंदवली जाते. यानंतर मेरीच्या भूकंपमापन विभागातील अधिकारी याचे मोजमाप व अध्ययन करून तीव्रता स्पष्ट करतात. परंतु, आधुनिक यंत्रणेत भूकंपाची माहिती थेट संगणकावरच उपलब्ध होणार असल्याने भूकंपाच्या तीव्रतेबाबत त्वरित निष्कर्ष प्राप्त होणार असल्याने अधिका-यांना करावा लागणारा द्राविडी प्राणायाम थांबणार आहे.
धरणांची घेतो काळजी
धरण क्षेत्राचा सखोल अभ्यास करूनच धरण बांधण्याचा निर्णय घेतला जातो. भूकंपाचा धोका लक्षात घेऊनच त्याप्रमाणे आराखडा तयार केला जातो. नवीन यंत्रणा जमिनीखालील घडामोडींचा वेध घेईल.
विजय पांढरे, मुख्य अभियंता मेटा
अभ्यासास सुलभ
नव्या यंत्रणेमुळे भूकंपमापनातील माहिती संगणकावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यावर अभ्यास करण्यासाठी सुलभ होईल.
ए. एस. माहिरे, भूकंपमापन नियंत्रण कक्ष