आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात एका दिवसात १७९ मि.मी. पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, शनिवारीही दिवसभर संततधार होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी जिल्ह्यात १७९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. नाशिक, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, कळवण, सुरगाणा या तालुक्यांत पावसाचा जोर होता.

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने चांगली सुरुवात केली आहे. रविवार आणि सोमवारी हवामान विभागाने मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, गुरुवारनंतर पावसाच्या उघडीपीचा अंदाज आहे. जुलैचा पाऊस (मिलिमीटरमध्ये) : नाशिक : ११, इगतपुरी : ३१, दिंडोरी : ११, पेठ : ३२.८, त्र्यंबकेश्वर : २४, मालेगाव : ३, नांदगाव : ०, चांदवड : २.४, कळवण : २०.५, बागलाण : ४, सुरगाणा :३०, देवळा : ४, निफाड : १.४, सिन्नर : २.
धरणसाठ्यांत वाढ
गेल्याचार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यांत वाढ हाेत अाहे. गंगापूर धरणसमूहात १३ टक्के पाणीसाठा झाला अाहे. यात गंगापूर धरणात २० टक्के, कश्यपी धरणात टक्का, तर गाैतमी-गाेदावरी धरणात १३ टक्के पाणीसाठा झाला अाहे. पालखेड धरणसमूहातील करंजवण धरणात टक्के, तर वाघाड धरणात टक्के पाणीसाठा झाला अाहे. तसेच, दारणा धरणात ३१ टक्के, भावली धरणात ३३ टक्के, वालदेवी धरणात टक्के, कडवा धरणात टक्के, भाेजापूर धरणात १४ टक्के पाणीसाठा झाला अाहे. गिरणा खाेऱ्यातील चणकापूर धरणात २६ टक्के, हरणबारी धरणात टक्के, केळझर धरणात टक्के वाढ झाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...