आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिलपासून घरपट्टीत 18, तर पाणीपट्टीमध्ये 40% वाढ; पाच वर्षांत 120% टक्के करवाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अाधीच नानाविध करवाढीच्या अाेझ्याखाली दबलेल्या नाशिककरांवर घरपट्टी पाणीपट्टीवाढीचा नवीन भार येणार असून, एप्रिल २०१८ पासून पुढील पाच वर्षांसाठी घरपट्टीत १८ टक्के, तर पाणीपट्टीत तब्बल १२० टक्के वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीत भाजपने बहुमताच्या जाेरावर मंजूर केला. गेल्या २२ वर्षांत करवाढ झाली नसल्याचे कारण देत एेतिहासिक करवाढ करीत भाजपने सर्वांनाच दणका दिला. दरम्यान, ‘स्मार्ट सिटी’साठी करवाढ गरजेची असल्याचे समर्थन भाजपने केले, तर करबुडव्यांवर प्रथम कारवाई करून त्यानंतर प्रामाणिक करदात्यांवर वाढीचा भार टाकावा, ही मागणी फेटाळल्यामुळे शिवसेनेने पालिकेवर माेर्चा अाणण्याचा इशारा दिला. 

दरवर्षी प्रशासनाकडून करवाढीबाबत स्थायी समितीवर येणारे प्रस्ताव तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावले हाेते. फेब्रुवारी २०१७ मध्ये तेव्हाच्या सत्ताधारी मनसेने स्थायी समितीवर असलेला घरपट्टी पाणीपट्टीचा प्रस्ताव फेटाळून ‘प्रथम करबुडव्यांना घरपट्टी अाकारा त्यानंतरच प्रामाणिक करदात्यांवर बाेजा टाका’, अशी भूमिका घेतली हाेती; मात्र महापालिकेत स्पष्ट बहुमतावर सत्तेत अाल्यानंतर भाजपने करवाढीचा इरादा स्पष्ट केला हाेता. यापूर्वी प्रशासनाने स्थायी समितीवर करवाढीचे प्रस्ताव ठेवले हाेते; परंतु फेब्रुवारीत यापूर्वीची करवाढ फेटाळली गेली असल्यामुळे भाजपला नियमानुसार ज्या दिवशी प्रस्ताव फेटाळला त्या दिवसापासून पुढील तीन महिने काेणताही निर्णय घेण्याच्या नियमामुळे वाढ करता अालेली नव्हती. मे महिन्यात ही मुदत संपल्यानंतर स्थायी समितीवर प्रशासनाने सुधारित करवाढीचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावावर बुधवारी (दि. १६) स्थायी समितीत अाैपचारिक चर्चा झाली. प्रशासनातर्फे करवाढीचा प्रस्ताव मांडताना उपअायुक्त राेहिदास दाेरकुळकर यांनी गेल्या २२ वर्षांत घरपट्टी पाणीपट्टीत वाढ झाली नसल्यामुळे करवाढ अपरिहार्य असल्याचे कारण दिले. महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्मार्ट सिटी अन्य केंद्र शासनाच्या याेजनांचा लाभ हवा असेल तर कर सुधारणा हा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले. करवाढ झाल्यास नगरसेवक निधी, अमृत याेजना अन्य बाबींवर याचा परिणाम हाेऊ शकताे, याची जाणीवही त्यांनी करून दिली. 

भाजप म्हणताे, करवाढ ही नाशिककरांचीच इच्छा... 
भाजपच्यावतीने भूमिका मांडताना ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत जाधव यांनी करवाढ करणे ही नाशिककरांचीच इच्छा असल्याचा अजब दावा केला. ‘तुम्हाला नाशिक खेडे वाटत असेल त्याचे रूपांतर चांगल्या शहरात करायचे असेल तर करवाढ गरजेची अाहे, असे त्यांनी सांगितले. करवाढीमुळे प्रत्येक वाॅर्डात नगरसेवक निधी मिळेल कामे हाेतील, असेही ते म्हणाले. 

शिवसेना,कांॅग्रेसकडून नावापुरताच विराेध
अाक्रमकअांदाेलनांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवसेनेने माेर्चा अाणण्याचा इशारा दिला असला तरी सभेमध्ये मात्र भाजपचा अाग्रह बघता करवाढीला नावापुरताच विराेध केला. प्रस्ताव मांडल्यानंतर भाजपच्या सदस्यांनी जाेरात बाके वाजवून करवाढीचे समर्थन केले. त्यानंतर शिवसेनेचे सूर्यकांत लवटे यांनी प्रथम घरपट्टी पाणीपट्टी बुडवणाऱ्यांवर कारवाई करा, मगच प्रामाणिक करदात्यांवर बाेजा टाका, अशी मागणी केली. अाजघडीला अनेक माेठ्या हाॅटेल्ससह बड्या अास्थापनांना कर नाही. त्यांचे सर्वेक्षण झाल्यावरच करवाढ करा, अशी मागणी त्यांनी केली. डी. जी. सूर्यवंशी यांनीही घरगुती वापराच्या मिळकतीत व्यावसायिक वापर हाेत असून निव्वळ त्यांच्यावर कारवाई केली तरी करवाढीची गरज पडणार नाही, असे सांगितले. प्रवीण तिदमे यांनी शहराची अवस्था खेड्यासारखी असून नुसती करवाढीची भाषा हाेते; मात्र लाेकांना सुविधा कधी देणार, असा सवाल करीत शिवसेनेचा याला विराेध असल्याचे स्पष्ट केले. कांॅग्रेसच्या वत्सला खैरे यांनी प्रभागापुरतीच भूमिका घेत गावठाणाला करवाढीतून वगळा, अशी अजब सूचना केली. 

अशी आहे घरपट्टीतील दरवाढ 
स्थायीसमितीने घरपट्टीत तब्बल १८ टक्के दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामध्ये सर्वसाधारण करामध्ये प्रत्येक टप्प्यात पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच सर्वसाधारण स्वच्छता करात तीन टक्के, जललाभ कर पथक कर दाेन टक्के, मनपा शिक्षण करात एक टक्का तर मलनि:सारण लाभ करात पाच टक्के दरवाढ करण्यात आली आहे. आगनिवारण कर वृक्षसंवर्धन करांमध्ये बदल नाही. सरकारी शिक्षण कर, रोजगार हमी कर निवासी कर हे शासनाच्या कायद्यातील तरतुदींनुसार लागू राहणार आहेत. 

सारे काही नगरसेवक निधीसाठी..... 
घरपट्टीत१८ तर पाणीपट्टीत ४० टक्के वाढ केल्यामुळे प्रशासनाला वार्षिक १३ काेटी रुपये अपेक्षित अाहेत; मात्र ही वाढ केवळ प्रामाणिक करदात्यांच्या खिशातून वसूल हाेईल. सध्या महापालिकेचे घरपट्टीचे वार्षिक उद्दिष्ट ११० काेटी रुपयांच्या घरात असून साधारण ८० काेटींच्या अासपास वसुली झाली हाेती. तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ५४ काेटी असताना केवळ २९ काेटींच्या अासपास वसुली झालेली हाेती. थाेडक्यात, थकबाकीचे प्रमाण जितके माेठे अाहे त्यापेक्षा करवाढीची रक्कम कमी असल्यामुळे भाजपचे समर्थन ताेकडे ठरणार अाहे. मुख्य म्हणजे, करवाढ केल्यास अायुक्तांनी ७५ लाख रुपये नगरसेवक निधी मिळणार नाही अशी तंबी दिल्याचा परिणाम म्हणूनही भाजपच्या निर्णयाकडे बघितले जात अाहे. 

शिवसेना उभारणार जनअांदाेलन 
घरपट्टीपाणीपट्टीतपाच वर्षांसाठी वाढ करण्याचा माेठा निर्णय स्थायी समितीने परस्पर घेतलाच कसा? गटनेते अन्य पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही. मुळात, मिळकत सर्वेक्षण बाकी असून करबुडवे माेकळेच अाहेत. शहराला दाेन वेळ पाणी नाही; मात्र पाणीपट्टीत १२० टक्के वाढ केली अाहे. नाशिक दत्तक घेतल्यानंतर पदरात काही पडले तर नाहीच; मात्र नाशिककरांच्याच झाेळीतील उरलीसुरली रक्कम अाेरबडण्याचे काम सुरू झाले अाहे. शिवसेना करवाढीविराेधातील मतांची माेट बांधत माेठे जनअांदाेलन उभे करील. लवकरच पालिकेवर माेठा माेर्चा काढून निषेध केला जाईल. 
- अजय बाेरस्ते, विराेधी पक्षनेते, शिवसेना 
 
पाच वर्षांत पाणीदर प्रतिहजार लि. ११ रु. 
पाणीपट्टीतएप्रिल २०१८ पासून पाच वर्षांत तब्बल १२० टक्क्यांनी वाढ हाेणार अाहे. सध्या घरगुती पाण्यासाठी प्रतिहजार लिटर रुपये दर असून पुढील पाच वर्षांत म्हणजेच सन २०२२-२३ पर्यंत प्रतिहजार लिटर ११ रुपये दर हाेणार अाहे. पहिल्या वर्षी दाेन रुपये तर त्यानंतर उर्वरित चार वर्षे प्रत्येकी एक रुपया वाढ हाेईल. अशीच परिस्थिती बिगर घरगुती अाणि व्यावसायिक प्रतिहजार लिटर पाण्यासाठी हाेणार अाहे. 

नळजोडणी शुल्कातही दुपटीने वाढ 
पाणीपट्टीबरोबरचनळजोडणी शुल्क तसेच अनामत शुल्कातही दुपटीने वाढ करण्यात आली आहे. अर्धा इंच नळजोडणीसाठी आता नळजोडणी शुल्क ५० वरून १०० रुपये, पाऊण इंचीसाठी ७५ वरून १५०, एक इंचीसाठी १०० वरून २००, दीड इंचीकरिता ३०० वरून ६००, दोन इंचीसाठी ५०० वरून एक हजार तर तीन इंची नळजोडणीसाठी एक हजारवरून दोन हजार रुपये शुल्कवाढ करण्यात आली आहे. 

रस्ता फोडणेही महाग 
नळजोडणीसाठीरस्ता फाेडण्याची गरज भासल्यास त्याचे शुल्क पालिकेकडे भरावे लागते. या दुरुस्ती शुल्कातही तब्बल ६० टक्क्यांपर्यंत वाढ झाली अाहे. यापुढे कच्चा रोड फोडण्यासाठी प्रति चौ. मी. ८०० रुपयांवरून १२८०, डांबरी रोडसाठी १२०० वरून १९२० तर कॉँक्रीट रोड फोडण्यासाठी २२०० वरून ३२०० रु. असे दर वाढविण्यात आले आहेत. 

टॅँकरद्वारे पाणीपुरवठाही महाग 
पालिकेच्याटॅँकरच्या दरात वाढ झाली अाहे. एक हजार लिटर पिण्याच्या पाण्यासाठी पूर्वी प्रतिखेप १०० रुपये घेतले जात हाेते. आता दुप्पट म्हणजेच २०० रुपये मोजावे लागणार आहेत. टॅँकरद्वारे चार हजार लिटर पाण्याचे दर २७५ वरून ४५०, सहा हजार लिटर पाण्यासाठी ६५०, अाठ हजार लिटर पाण्याचे दर ४०० वरून ७५०, तर दहा हजार लिटर पाण्यासाठी १०५० रु. असे दर अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...