आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

34 केबल ऑपरेटर्सनी भरला 18 लाख रु. कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- स्थानिक केबलचालक व एमएसओ (मल्टी सिस्टिम ऑपरेटर) यांनी मंगळवारपासून संयुक्त प्रतिज्ञापत्रासह करमणूक कर भरण्यास सुरुवात केली असून, दुसर्‍या दिवशी 34 जणांनी प्रतिज्ञापत्र सादर करत 18 लाख 20 हजार रुपयांच्या कराचा भरणा केला. दोन दिवसांत 53 प्रतिज्ञापत्रधारकांकडून 29 लाख रुपयांच्या कराची वसुली झाली आहे.

सत्य ग्राहकसंख्या ओळखता येत नसल्याने शासनाने संयुक्त प्रतिज्ञापत्राचा आग्रह धरला. जिल्हाधिकार्‍यांनीही तंबी दिल्याने 10 सप्टेंबरला 19 जणांनी प्रशासनाकडे कर भरला. त्यापूर्वी 74 केबलचालकांनी 25 लाख 41 हजार 349 रुपये कर न्यायालयात भरला होता.

पालिका हद्द सीमारेषेवर कर चोरीची शक्यता : ट्रायने महानगरपालिका क्षेत्रात कर डिजिटलायझेशनचा निर्णय लागू केला आहे. ग्रामीण भागात अद्याप त्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. शहरातीलच केबल कंपन्या बहुतांश ग्रामीण भागातही सेवा देतात. त्यामुळे महापालिका हद्दीच्या सीमारेषेवरील ग्राहकांची ग्रामीण ग्राहकांमध्ये सरमिसळ केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.