आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 19 Crore Financial Assistance To Farmers Issue At Nashik

दुष्काळी अनुदान: शेतकऱ्यांना १९ कोटींचे अर्थसाहाय्य, ५४ हजार शेतकऱ्यांना होणार लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - वरुण राजाच्या अवकृपेने गतवर्षीचा खरीप हंगाम वाया गेल्यानंतर राज्य शासनाने तालुका दुष्काळी म्हणून जाहीर केला होता. खरिपाने वाया गेलेल्या हंगामानंतर हवालदिल शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गारपिटीने रब्बीतही हिसकावला, त्यामुळे दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे.

५० टक्क्यांच्या आत आहेणेवारी असलेल्या तालुक्यातील १२४ गावांमधील सुमारे ५४ हजार शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात १९ कोटी ३९ लाख रुपयांचा मदतनिधी महसूल यंत्रणेला प्राप्त झाला आहे. सातत्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या तालुक्याला गतवर्षीही पावसाच्या अवकृपेचा फटका बसला होता. जुलऔ महिन्यात उशिराने पावसाने हजेरी लावली. मात्र, सरासरीइतकाही पाऊस झाल्याने खरिपाच्या हंगामातील पिके पाण्याअभावी वाया गेली. पिण्याच्या पाण्याची भ्रांत बळीराजाला झाल्याने तळ गाठलेल्या विहिरीही कोरड्याठाक पडल्या होत्या. शेतकरी हवालदिल झाल्याने दुष्काळी तालुका जाहीर व्हावा, यासाठी मागणी सुरू झाली. तालुक्यातील १२४ गावे ५० टक्के आणेवारीच्या आत असल्याने शासनाने येवल्याचा समावेश केला.

७० गावांना लाभ
१२४गावांना जो दुष्काळाचा मदतनिधी देण्यात येणार आहे. त्यात आता ४० टक्के प्राप्त निधीत गावांच्या इंग्रजी नावांमधील पहिल्या आद्याक्षराप्रमाणे मदतनिधी देण्यात येणार आहे. १९ कोटी ३९ लाख रुपयांच्या मदतनिधीत सुमारे ७० गावांमधील शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मिळणारा निधी
४३१०० अल्पभूधारक (२ हेक्टरपर्यंत)
१०८०० बहुभूधारक (२ हेक्टरपेक्षा जास्त)
४५०० जिरायत क्षेत्र
९००० बागायत क्षेत्र
१२००० फळपिके

४७ कोटींची मागणी
शासनाकडून दुष्काळग्रस्त १२४ गावांमधील ५४ हजार शेतकऱ्यांसाठी ४७ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी महसूलने केली आहे. राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात यातील ४० टक्के म्हणजेच १९ कोटी ३९ लाख रुपयांचा मदतनिधी पाठविला आहे. यातील नऊ कोटी रुपये सोमवारी बँकांकडे वर्ग केले आहे.