आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बॉलीवूड मेकअप’ची शंभर वर्षे १११ सेकंदांत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भारतीय चित्रपटसृष्टी ही सर्वार्थाने प्रगल्भ असून, यात होत गेलेले बदल हा या क्षेत्राचा आत्मा आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत १०० वर्षांत अनेक मेकअप आर्टिस्ट बदलले आणि त्यासोबतच त्यांच्या मेकअपची पद्धतही बदलली. हा प्रवास कट डॉट कॉमने अवघ्या १११ सेकंदांच्या व्हिडिओत मांडला आहे.
२७ मे २०१५ रोजी ‘१०० इयर्स ऑफ ब्यूटी’ या व्हिडिओ सिरीजमधला भारतीय चित्रपटसृष्टीचा सौंदर्य इतिहास सांगणारा हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. यात १९१० ते २००० पर्यंतचे मेकअपमधील बदल त्रिशा मिगलानी या युवतीच्या चेहऱ्यावर दाखविण्यात आले आहेत. पूर्वी मेकअपला फार महत्त्व नव्हते. पण, आज चित्रपटांतील प्रत्येक चेहरा मेकअपने बहारदार दिसतो. या गोष्टी कशा घडत गेल्या त्याची सुरुवात दाखविण्यात आली आहे. अपलोड केल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत यू-ट्यूबवर तब्बल १८ हजार लाइक्स २७ लाख ७५ हजार १०४ व्ह्यूव्ज या व्हिडिओला मिळाल्या आहेत.
१९२० सालातील देविका राणीपासून ते २००० सालातील दीपिका पदुकोन कशी फॅशन ट्रेंड बनली, हा प्रवास या व्हिडिओतून आपल्याला पाहता येतो. १११ सेकंदांचा अतिशय थोड्या वेळात हा व्हिडिओ तयार केला आहे. याचे निर्माते, दिग्दर्शक दोन्ही कट व्हिडिओ डॉट कॉम असून, १०० इयर्स ऑफ ब्यूटी सिरीजमधला हा सातवा एपिसोड आहे.
कट डॉट कॉम वेबसाईट
‘कटडॉट कॉम’ हा कट व्हिडिओ म्हणजे लहान व्हिडिओ तयार करणारे संकेतस्थळ आहे. काही दिवसांपासून यू-ट्यूबवर १०० इयर्स ऑफ ब्यूटी ही सिरीज अपलोड करण्यास सुरुवात केली. त्यात भारतीय चित्रपटसृष्टीचा सौंदर्य प्रवास २७ मे रोजी अपलोड केला. या व्यतिरिक्त सिरीजमध्ये व्हिएतनाम, यूएसए, कोरिया इ. चित्रपटसृष्टीवर आधारित व्हिडिओही आहेत.