आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका गाळ्यासाठी २.६४ लाख ,दिल्लीच्या व्यावसायिकाने मोजली रक्कम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- साधुग्राममधील गाळ्यांच्या लिलावात बोली लावण्यासाठी व्यावसायिकांची बुधवारी (िद. २९) भरपावसात एकच झुंबड उडाली. साधुग्राममधील प्रवेशद्वारालगतच्या सेक्टर १-ए मधील क्रमांक ११ या गाळ्यासाठी सरकारी किमतीच्या तब्बल पंधरापट म्हणजेच दोन लाख ६४ हजार रुपयांपर्यंतची सर्वाधिक बोली लागली. दिल्लीच्या व्यावसायिकाने हा गाळा घेतला असून, किराणा आणि जनरल स्टोअर्सची सुविधा पुरविली जाणार आहे. तर, दुसरीकडे अंध अपंगांच्या गाळ्यासाठीही ७५ हजार रुपयांची बोली लागली. साधुग्राममधील ६० गाळ्यांची लिलाव प्रक्रिया पार पडली असून, सरासरी १० हजार ते दोन लाख ६४ हजारांपर्यंत बोली लागली.
तपोवन परिसरातील साधुग्राममध्ये पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यावसायिक गाळ्यांची लिलाव प्रक्रिया बुधवारी पार पडली. साधुग्राममधील साधू, महंत भाविकांसाठी जीवनावश्यक वस्तू पूजा साहित्याच्या विक्रीसाठी धार्मिक सेक्टरप्रमाणे व्यावसायिक गाळे उभारण्यात अाले अाहेत. सिंहस्थ कक्षात या गाळ्यांची लिलाव प्रक्रिया बुधवारी (दि. २९) सेक्टरनिहाय पार पडली. महिला बचत गटांसाठी राखीव गाळ्यांच्या लिलावाची रक्कम चढाओढीमुळे चांगलीच वाढल्याने अनेक महिला नाराज झाल्या त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

अपंगांसाठीचा गाळा ७५ हजार रुपयांना...
साधुग्राममधीलसेक्टर १- ए, बी, डी तर सेक्टर मध्ये ए, बी, डी आणि असे सेक्टरनिहाय १३१ व्यावसायिक गाळे उभारण्यात अाले अाहेत. त्यातील मुख्य प्रवेशद्वारालगतच्या १- सेक्टरमधील अपंगांसाठीच्या राखीव गाळ्यासाठी तब्बल ७५ हजार रुपयांची, तर महिला बचत गटांसाठीच्या गाळ्याला ३९ हजार ५०० रुपयांपर्यंतची बोली लागली. पहिल्या दिवशी ६० गाळ्यांची लिलाव प्रक्रिया पार पडली असून, उर्वरित गाळ्यांचे लिलाव गुरुवारी (दि. ३०) सकाळी वाजेपासून सेक्टरनिहाय होतील.
व्यावसायिकांनी भरपावसात लांबलचक रांग लावून लिलाव प्रक्रियेत भाग घेतला.
..तर कारवाई
साधुग्राममध्येपालिकेतर्फे पत्र्यांच्या शेडमध्ये केवळ गाळे उपलब्ध करून दिले आहेत. ज्या वस्तूंची विक्री ठरवून दिले आहे, त्यांची विक्री करावी लागेल. त्यासाठी इतर सर्व परवानग्याही स्वत:ला मिळवाव्या लागतील. पोटभाडेकरू, विनापरवानगी वस्तूंची विक्री झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपायुक्त अार. एम. बहिरम यांनी िदला.

लिलावावेळी गोंधळ
सेक्टरमधील गाळ्यांचा लिलाव सुरू होण्यापूर्वी अनामत भरण्यासाठी गर्दी झाली. सिंहस्थ कक्षात लिलाव सुरू झाल्यावर प्रतीक्षेत असलेल्यांसाठी व्यवस्था केल्याने कर्मचारी व्यावसायिकांचे वाद झाले. प्रक्रियेत अडथळा येऊ नये, यासाठी दोरी लावून अर्जकर्त्यांना बाहेर काढण्यात आले.