आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देवळालीत दाेन दुचाकी जाळल्या, चाैधरी मळा परिसरातील घटनेने परिसरात भीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली कॅम्प - येथील चौधरी मळा परिसरात दाेन दुचाकी समाजकंटकांनी जाळल्याचा प्रकार घडला अाहे. साेमवारी रात्री घडलेल्या या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण असून, या परिसरात पाेलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली अाहे.

 

देवळाली पाेलिसांत याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार शफीक अब्दुल शेख (रा. चौधरी मळा, जुनी स्टेशनवाडी) हे त्यांच्या कुटुंबासह सोमवारी (दि. २०) रात्री ११.३० वाजेच्या दरम्यान जेवण करून झोपले असता रात्री २.३० च्या दरम्यान अज्ञान इसमाने नुकसान करण्याच्या उद्देशाने मोहम्मद इद्रिस शहा यांची होंडा कंपनीची युनिकाॅर्न (एमएच १५ इके ५२२०) या दुचाकीचे ३५ हजारांचे नुकसान झाले. तर शेजारीच उभी असलेली अशोक मुरलीधर अल्लाटे यांच्या दुचाकीचे (एमएच १५ ३१८२) पाच हजारांचे नुकसान हजाराचे नुकसान झाले असून, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात अाला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ नरोटे करीत आहे.

 

पाेलिसांची गस्त वाढवावी
या अाधीही या परिसरात इलेक्ट्राॅनिक माध्यमाचे प्रतिनिधी गोकुळ लोखंडे याची दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला आहे. जुनी स्टेशनवाडी, रेल्वेस्टेशन परिसर, भगूर बसस्थानक, गवळीवाडा, अाठवडे बाजार परिसर, लहवितरोड, नानेगावरोड, राहुरी फाटा या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी.
- सायरा शेख, शहराध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस

बातम्या आणखी आहेत...