आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सव्वादोन कोटींची वृक्ष निविदा रद्द करण्याच्या हालचाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना सव्वादोन कोटी रुपयांच्या वृक्षलागवडीचा डाव अखेर संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांच्या पवित्र्यामुळे उधळला गेल्याचे वृत्त आहे. वादग्रस्त वृक्ष निविदा रद्द करण्यासाठी आता महापौरही सहमत झाले आहेत.

एलबीटीमुळे महापालिकेला जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात नवनिर्माणाची कामे सुरू असून, ठेकेदारांची देयकांसाठी पालिकेत गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक बाबीत काटकसरीचे धोरण राबवण्याची मागणी होत असताना, 20 जून रोजी एका वर्तमानपत्रात पालिकेच्या उद्यान विभागाने सव्वादोन कोटी रुपयांची वृक्षलागवडीसाठी निविदा काढली. यात एक लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट होते. निविदा निघाल्यानंतर निमा या उद्योजकांच्या संघटनेने महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांची भेट घेतली व वृक्ष निविदा रद्द करून त्या खर्चाची बचत करावी, असा प्रस्ताव मांडला होता.

संबंधित वृक्षलागवडीचे संपूर्ण उद्दिष्ट निमा ही संघटना विनामूल्य खांद्यावर घेईल. त्या बदल्यात केवळ महापालिकेने जागा द्यावी व प्रसंगी वृक्षलागवडीला स्वत:चे नावही न देण्याची तयारी दाखवली. मात्र, महापौरांनी न्यायालयीन आदेशाचे दाखले देत वृक्षलागवड पालिकेमार्फतच करण्याबाबतचा आपला अट्टहास कायम ठेवला होता.

दरम्यान, या धोरणाबाबत टीका झाल्यानंतर मनसेचे संपर्कप्रमुख अभ्यंकर यांनी दखल घेत निविदा रद्द करण्यासंदर्भात महापौरांना सूचना केल्याचे समजते. त्यामुळेच की काय दुसर्‍या दिवशी महापौरांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना कोणी मोफत वृक्षलागवड व संवर्धनाची जबाबदारी घेत असेल तर आमची हरकत नसेल, असे सांगत निविदा रद्द करण्याची तयारी दाखवली.