आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दिवसांत ‘स्वाइन’मुळे दाेघे मृत; बळींची संख्या 51

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्लूचा धुमाकूळ सुरूच असून, सप्टेंबर महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात दोघांचा बळी घेतल्यामुळे स्वाइन फ्लूमुळे मृत झालेल्यांची संख्या ५१ इतकी झाली अाहे. 
 
मध्यंतरी अाटाेक्यात असलेल्या स्वाइन फ्लूने पुन्हा एकदा डाेके वर काढले असून, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांतच महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण आढळले अाहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या मात्र, पालिकेच्या हद्दीबाहेरून अालेल्या रुग्णांची संख्या १३ असून, त्यापैकी दोघांचा बळी गेला आहे. 
 
ऑगस्ट महिन्यात शहरात ६६, तर ग्रामीण भागात मात्र शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५१ हाेती. त्यापैकी शहरातील तर, ग्रामीण भागातील जणांचा मृत्यू या आजारामुळे झाला हाेता. दरम्यान, जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ‘स्वाइन फ्लू’च्या बळींचा अाकडा ५१ झाला अाहे. 
 
‘डेंग्यू’चे संशयित वाढले 
शहरातसाथराेगांचा तडाखा सुरूच असून स्वाइन फ्लूबराेबरच डेंग्यूचाही प्रादुर्भाव वाढल्याचे रुग्णसंख्येवरून स्पष्ट झाले आहे. सप्टेंबर महिन्यातील गेल्या पाच दिवसांतच डेंग्यूसदृश आजाराचे ३५ संशयित रुग्ण आढळून आले अाहेत. त्यांचे रक्तनमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात अर्थात ऑगस्टमध्ये ९७ जणांना डेंग्यूची लागण झाली हाेती. 
बातम्या आणखी आहेत...