आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० लाखांची खंडणी मागणारे दाेघे जेरबंद, मुलाच्या अपहरणाची धमकी; २४ तासांत अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ५० लाख रुपयांची खंडणी दिली नाही तर मुलाचे अपहरण करून हात-पाय तोडण्याची धमकी देण्याचा प्रकार शुक्रवारी (दि. ५) सायंकाळी द्वारका सर्कल येथे उघडकीस आला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयिताच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शनिवारी याप्रकरणी दाेन जणांना जेरबंद केले अाहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि हरिश वल्लभदास मकवाना (रा. साईबाबा मंदिर, तपोवन) यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास द्वारका सर्कलमार्गे तपोवनकडे जात असताना संशयित प्रदीप आणि त्याच्या चार-पाच साथीदारांनी चौकात अडवून ५० लाखांची मागणी केली. रक्कम दिली नाही तर मुलगा रणछोड मकवाना याचे अपहरण करून त्याचे हात-पाय तोडण्याची धमकी दिली. भेदरलेल्या अवस्थेत मकवाना यांनी भद्रकाली पोलिसांत धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी गुन्हा दाखल केला. मकवाना हे व्यावसायिक आहेत. सिंहस्थकाळात ग्यानदास महाराज यांचे वास्तव्य मकवाना यांच्या निवासस्थानी होते. तेव्हापासून मकवाना अधिक चर्चेत आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोठ्या रकमेच्या इराद्याने संशयितांनी खंडणी मागितली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

खंडणी मागणारे नियोजनबद्ध तपासाने जेरबंद : खंडणीचागुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. द्वारका परिसरात सापळा रचण्यात आला. पैसे देण्यासाठी तक्रारदाराला एका जागेवर थांबवण्यात आले. दोघांना खंडणीची रक्कम देताना विशिष्ट इशारा केल्यानंतर दबा धरून बसलेल्या पाेलिस पथकाने कारमध्ये बसलेल्या दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये प्रवीण अंबालाल पटेल (रा. हिरावाडी) नंदू जगन्नाथ धात्रक (रा. दिंडोरी) असे नाव सांगितले. झडतीत कारमध्ये एअरगन अाढळली. कार एअरगन जप्त करण्यात अाली. सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे, उपनिरीक्षक हनुमंत वारे, सोमनाथ सातपुते, संतोष उशीर, पप्पू डोंगरे, एजाज पठाण, संतोष पवार, प्रवीण पगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. भद्रकाली पोलिसांच्या नियोजनबद्ध तपासामुळे एक दिवसात खंडणीखोरांना जेरबंद करण्यास यश आले. पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसात खंडणीखाेरांना जेरबंद करण्यात यश अाले.

बातम्या आणखी आहेत...