आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन वेळा पाणीपुरवठा, येत्या महासभेत प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण समूहात मुबलक पाणीसाठा झाल्याने अाता येत्या महासभेत शहरात दाेन वेळा पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत प्रस्ताव ठेवला जाईल, अशी माहिती महापाैर अशाेक मुर्तडक यांनी दिली. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नाशिककरांना माेठा दिलासा मिळणार अाहे.
गेल्या वर्षी जायकवाडीसाठी पाणी साेडल्याचे भीषण परिणाम नाशिककरांना भाेगावे लागले. डिसेंबरपासून सुरू झालेली पाणीकपात वाढत वाढत ३० टक्क्यांपर्यंत गेली. अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याची वेळ अाली. जून महिना काेरडा जात असल्याचे बघून छुप्या पद्धतीने पाणीकपात वाढवल्याचे अाराेप झाले. दरम्यान, जुलै महिन्यात ‘छप्पर फाडके पाऊस’ झाल्यामुळे गंगापूर धरण समूहात समाधानकारक पाणीसाठा झाला अाहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे गटनेते अजय बाेरस्ते यांनीही दाेन वेळा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली हाेती. अाजघडीला जायकवाडीला माेठ्या प्रमाणात पाणी साेडण्यात अाले असून, भविष्यात पुन्हा त्यांच्याकडून गतवेळेप्रमाणे गंगापूरच्या पाण्यावर दावा करण्यात येऊ शकताे. या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी कपातीचे चटके सहन करण्यापेक्षा दाेन वेळा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशीही मागणी हाेती. महापाैरांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत महासभेत सर्वांचे मत एेकून घेत दाेन वेळा पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे स्पष्ट केले.

नवीन नळजाेडणीला परवानगी, मात्र कपात कायम
पाणीटंचाईकपातीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील नवीन जुन्या बांधकामांचा पाणीपुरवठा बंद केला हाेता. नवीन नळजाेडणीलाही परवानगी दिली जाणार नव्हती. दरम्यान, गंगापूर धरण समूहात चांगला पाणीसाठा झाल्यामुळे अाता ही बंदी उठवण्यास पाणीपुरवठा विभागाने सहमती दाखवली अाहे. त्यामुळे नळजाेडणीसाठी तिष्टणाऱ्यांना दिलासा मिळणार अाहे. दुसरीकडे मात्र कपातीच्या कारणास्तव नळजाेडणीवर बंदी हाेती ती कायम असल्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या निर्णयाविषयी विराेधाभास व्यक्त हाेत अाहे.

बातम्या आणखी आहेत...