आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयीन तरुणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मित्रांसमवेत फिरण्यास गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा तलावात बडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. २) सायंकाळी वाजता चामरलेणी येथे हा प्रकार घडला. अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री उशिरा या दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरीरोडवरील कलानगर येथील पाच ते सहा मित्र सायंकाळी वाजेच्या दरम्यान चामरलेणी येथे फिरण्यास गेले होते. पेठरोड आणि चामरलेणीच्या पायथ्याशी असलेल्या तलावात पोहण्याचा त्यांना मोह झाला. पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज आल्याने अथर्व कुलकर्णी (१६) रोहित कोलते (१८, दोघे रा. कलानगर, दिंडोरीरोड) पाण्यात बुडाले. चार मित्रांनी परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आणून दिला. उर्वरित.पान
महाविद्यालयीन तरुणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू
काहीनागरिकांनी पोलिसांना याबाबत कळवले. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. पाण्यात गाळ अधिक असल्याने जवानांना पराकाष्टा करावी लागली. रात्री उशिरा दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले. कुलकर्णी हा के. के. वाघ महाविद्यालयात १२ वी सायन्स, तर कोलते महावीर अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. इतर मित्र त्याच्याबरोबर महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने नदी, तलाव, विहिरी, ओहळ तुडुंब भरले आहेत. अशा ठिकाणी महाविद्यालयीन तरुण फिरण्यास जातात. पाण्याचा अंदाज घेता पाण्यात उतरून जीव धोक्यात घालत आहेत. पोलिसांनी तलाव, धरण, नदी परिसरात गस्त करून तरुणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अथर्व कुलकर्णी
रोहित कोलते
-------------
बातम्या आणखी आहेत...