आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेम्पो-पिकअप अपघात, दोन ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सप्तशंृग गडावरूनदर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या छोटा हत्ती टेम्पोला पिकअपने समोरासमोर धडक दिल्याने टेम्पोतील दोन भाविक जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले. शनिवारी (दि. १५) सकाळी ६.३० वाजता दिंडोरीरोडवरील जकात नाक्यासमाेर हा भीषण अपघात घडला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयभवानी रोड आणि भालेराव मळा येथील राहणारे प्रशांत एकनाथ मोरे (२२), गणेश मनोहर सोनवणे (२१) आणि रोहित कदम, सलमान पठाण, रवींद्र पवार, शाहरुख पठाण, भूषण वाघमारे हे सर्व मित्र छोटा हत्ती टेम्पो (एमएच सीके ८१५६)ने वणीगडावर दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन सकाळी नाशिककडे येत असताना हॉटेल सैनीसमोर नाशिकहून दिंडोरीकडे भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअप (एमएच १२, सीटी ३८३५)ने टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात प्रशांत मोरे जागीच ठार झाला, तर गणेश सोनवणे हा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होण्यापूर्वी मृत झाला. इतर पाच गंभीर जखमी झाले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात पिकअपचालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे सर्व मित्र कोजागरी पौर्णिमेनिमित्त वणी गडावर दर्शनासाठी गेले होते. परत येताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात जखमींना पाहण्यासाठी गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...