आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20, 50, 100 च्या बोगस नोटांचा निवडणूक काळात सुळसुळाट, अर्थव्यवस्थेला अाव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हजार पाचशेच्या नोटा चलनातून बाद झाल्याने अनेक राजकीय इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षा धुळीस मिळाल्या असल्या तरी जुन्या चलनातील वीस, पन्नास आणि शंभरच्या रिझर्व बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी असलेल्या बोगस नोटा चलनात आणून अर्थव्यवस्थेलाच आव्हान देण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. बँकांत भरण्यासह किरकोळ बाजारातही या नोटांचा सुळसुळाट झाला आहे. एेन निवडणुकीच्या काळात बोगस नोटांच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची शक्यता आहे. 

रिझर्व बँकेने चलनातून हजार पाचशेच्या नोटा बंद केल्याने काळा पैसा बाहेर आला आहे. नाशिक पाेलिसांनी दाेन महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचा पदाधिकारी छबू नागरे, रामराव पाटील यांची बनावट नाेटा छापणारी टाेळीच जेरबंद केली अाहे. त्यापाठाेपाठ बाजारात वीस, पन्नास आणि शंभरच्या नोटांनिशी सर्वाधिक व्यवहार होत आहेत. या चलनाचा फायदा घेत समाजकंटकांनी चक्क नवीन आलेल्या पन्नासच्या नोटांसह जुन्या वीस आणि शंभरच्या बोगस नोटा चलनात आणल्या आहेत. किरकोळ बाजारात या नोटांची कुठलाही पारखकरता त्या चालवल्या जात अाहेत. या नाेटा अतिशय हुबेहूब असून, त्यावर बँकांकडून सांगितल्या जाणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या स्पष्टीकरणासह क्रमांक, शाई, त्यावरील महात्मा गांधींची प्रतिमा सर्वच अाहे. मात्र, पन्नासच्या नाेटांवर मधाेमध असणाऱ्या अाकड्याजवळ काळा चाैकाेनी ठिपकाच नसल्याचे अाढळून अाले अाहे. 

अशा प्रकारच्या नाेटा किरकाेळ भाजीबाजार, किराणा माल विक्रेत्यांकडे ग्राहकांकडून अाणल्या जात अाहेत. या प्रकारावर पोलिस यंत्रणा नजर ठेवून असली तरी बोगस नोटांबाबत तक्रार प्राप्त झाल्याने मुख्य सूत्रधार शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

रोजंदारीवरील मजुरांची फसवणूक 
दोनशेरुपये किरकोळ रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची फसवणूक यात होत आहे. निवडणूक काळात इच्छुकांकडून रॅली, सभा, शक्तिप्रदर्शनासाठी मजुरांना मागणी वाढली आहे. दोन हजारांच्या नोटांचा तुटवडा आणि पाचशेच्या नोटा बाजारात अधिक उपलब्ध नसल्याने शंभर, पन्नास आणि वीसच्या नोटाच सर्वाधिक चलनात आहेत. रोजंदारी कामगारांना बोगस नोटा देऊन फसवणूक केली जात आहे. 

अशी ओळखा नोट 
नवीन ५० रुपयांची नोट १४७ बाय ७३ एमएमची अाहे. या नोटेवर सुरक्षा कोड, आणि बोध चिन्ह इन्टाग्लाइओ प्रिंट, फ्लोसेंन्ट कलर, वाॅटरमार्क आणि रजिस्टर चिन्ह आहे. या नवीन नोटांचा क्रमांक हा चढत्या क्रमाने आहे. गांधीची प्रतिमा असलेल्या नोटवर गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी आहे. 

तक्रार आल्यास सखोल चौकशी 
शहरात बोगस नोटा चलनात असल्याची अद्याप तक्रार आलेली नाही. मात्र, सातपूर येथील विविध बँकांच्या मुख्य शाखांत भरणार झालेल्या नाेटांमध्ये १०० अाणि ५० च्या बनावट नाेटा मिळाल्याच्या तक्रारी संबंधित बँकांकडून करण्यात अाल्या अाहेत. त्यानुसार गुन्हे दाखल असून त्याची चाैकशी सुरू अाहे. अशा प्रकारच्या २०, ५० च्या बनावट नाेटा बनावट अाढळल्यास ग्राहकांनी निर्धास्तपणे पाेलिसांकडे तक्रार करावी. संबंधितांवर कारवाई हाेणार नाही. यासाठी बँकांनीही ग्राहकांची जनजागृती करावी. -लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपआयुक्त 

नागरिकांनी नाेटांबाबत जागरूकता बाळगावी 
पन्नासच्या नवीननोटा चलनात आल्या आहेत. मात्र, वीस अाणि शंभरच्या नवीन नाेटा अालेल्या नाहीत. जुन्याच नाेटा चलनात अाहेत. नवीन नोटांमध्ये बदल झाला असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी. बँकांनाही नोटा तपासून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. -सुनील खैरनार, क्षेत्रीय व्यवस्थापक, स्टेट बँक 
बातम्या आणखी आहेत...