आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसी सुरक्षेसाठी 20 नाके, 4 व्हॅन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून (दि. 31) नऊ दिवस औद्योगिक वसाहतीच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या असून, सातपूर आणि अंबडमध्ये तात्पुरते 20 तपासणी नाके, चार व्हॅन आणि हत्यारबंद पोलिसांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सुरक्षारक्षकांसह पोलिसांची गस्तही या काळात वाढवण्यात येणार आहे.

आयमाच्या कार्यालयात सर्व उद्योजकीय संघटनांची बैठक झाली. पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील यांनी उपाययोजनांची माहिती दिली. सहायक पोलिस आयुक्त हेमराजसिंग राजपूत यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पोवार, शांताराम अवसरे, आयमाचे अध्यक्ष सुरेश माळी, निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी, धनंजय बेळे, ज्ञानेश्वर गोपाळे, मंगेश पाटणकर आदी उपस्थित होते.

अंबडमध्ये 12, तर सातपूरमध्ये आठ ठिकाणी तपासणी नाके असतील. तेथे प्रत्येकी एक पोलिस कर्मचारी व सुरक्षारक्षक असतील.


उद्योजकांना पोलिसांच्या सुरक्षा टिप्स
> सुट्यांच्या काळात रात्री कारखान्याच्या सर्व गेटवरील दिवे सुरू ठेवा.

> मोठय़ा प्रमाणावर रक्कम कारखान्यात ठेवू नका.

> अँल्युमिनियम, ब्रॉँझ व तांब्याचा अतिरिक्त साठा ठेवणे टाळा.

> सुरक्षा एजन्सींनी रक्षकांना पोलिसांसमवेत करावयाच्या विशेष बंदोबस्ताचे धडे द्यावेत.

> सुरक्षारक्षक केबिनमध्ये पोलिसांचे महत्त्वाचे क्रमांक लिहून ठेवा.

> सीसीटीव्ही लावा, त्याचा बॅकअपही ठेवा.

> कारखान्यात विविध ठिकाणी भोंग्याचे (सायरन) बटण ठेवा.

> कामगारांनी एकट्याने प्रवास न करता गटागटाने प्रवास केल्यास चोर्‍या घटतील.