नाशिक. सिडको - कामगार दिनानिमित्त अंबड, सातपूर एमआयडीसीत काम करणार्या दोन हजार कामगारांचा सन्मान करण्यात आला. नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून सलग सातव्या वर्षी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भगवे फेटे परिधान केलेल्या कामगारांमुळे वातावरण भगवेमय दिसत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे उपस्थित होते. उपमहापौर गुरुमित बग्गा हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. यावेळी महिंद्रा कंपनीच्या कामगार युनियनचे खजिनदार ज्ञानेश्वर पाटील, नाना पवार आदींसह विविध मान्यवर हजारो कामगार उपस्थित होते.
नाशिकरोडला रॅली : नॅशनलरेल्वे मजदूर युनियन रेल्वे ठेका मजदूर युनियनतर्फे कामगार दिनानिमित्त कामगार जनजागृतीसाठी ट्रॅक्शन मशीन कारखाना येथून मोटारसायकल कार रॅली काढण्यात आली. रेल्वे स्टेशन, सुभाषरोड, अनुराधा चौक, बिटको, जेलरोड, दसकमार्गे देवी चौकात रॅलीचे रूपांतर सभेत झाले. त्यात सेक्रेटरी आनंद गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले.
नेहरूनगर: नेहरूनगर प्रेस कामगार वसाहतीत कामगार कल्याण केंद्र कार्यालयात कामगार नेते विक्रांत गवांदे यांच्या उपस्थितीत कामगार दिन साजरा झाला. दत्तात्रय टिळे यांनी मनोगत व्यक्त केले, तर नेते विलास गोडसे यांनी ‘वेतन आयोग : कामगारांची बदलती अर्थव्यवस्था’ यावर मार्गदर्शन केले.
सिडकोत कामगार दिनानिमित्त दोन हजार कामगारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी केले होते. यावेळी भगवे फेटे घातलेल्या कामगारांमुळे वातावरण भगवेमय झाले होते.
‘उधाण’तर्फे बालकामगार मुक्तीचा नारा
शाळांनासध्या सुटी लागल्याने अनेक ठिकाणी बालकामगार काम करण्यास येण्याची शक्यता असल्याने उधाण युवा ग्रुपतर्फे कामगार दिनाचे औचित्य साधून ग्रुपचे अध्यक्ष जगदीश बोडके यांच्या संकल्पनेनुसार ‘चला कामगारदिनी देऊया बालकामगार मुक्तीचा नारा’ या उपक्रमातून सामाजिक संदेश देणारी पत्रके गंगापूररोडवरील व्यावसायिकांना वाटण्यात आली. या उपक्रमात अजिंक्य घुले, भूषण गायकवाड, मोनीष पारेख, विक्रांत कोल्हे, शुभम झंवर यांनी भाग घेतला.