आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारक्षणांवर फिरणार खडखडाटामुळे पाणी, पालिका स्थायी समितीपुढे अडचणींचा डाेंगर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीच्या ताेंडावर पूर्वासुरींच्या कुचकामी धाेरणाचा फटका सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, दहा वर्षांपेक्षा अधिक काळ संपादनाविना राहिलेल्या २०३ अारक्षणांवर अार्थिक खडखडाट वादग्रस्त टीडीअार धाेरणामुळे पाणी साेडण्याची वेळ येणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले अाहे. परिणामी, शहरात मूलभूत गरजांसाठी माेकळी मैदाने राखून ठेवण्याची धडपड व्यर्थ ठरणार असून, अापसुकच त्यामाध्यमातून हाेणाऱ्या नवनिर्माणालाही ब्रेक लागण्याची भीती निर्माण झाली अाहे.

महापालिका अस्तित्वात अाल्यानंतर १९९३ मध्ये विकास अाराखडा बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ही प्रक्रिया १९९५ मध्ये पुर्ण हाेऊन अंतिम याेजना मंजूर झाली. अाता, या विकास अाराखड्यात रस्ते, मलजलशुद्धीकरण केंद्र, शाळा, अाराेग्य केंद्र, क्रीडांगणे जलकुंभ अशा नानाविध प्रयाेजनासाठी माेठ्या प्रमाणात अारक्षणे टाकण्यात अाली. एखाद्या जमिनीवर अारक्षण पडल्यानंतर संबंधित जमिनीचा माेबदला देण्याची जबाबदारी महापालिकेवर येते. मात्र, पालिकेची नाजूक परिस्थिती भूसंपादनाकडे सत्ता भाेगणाऱ्या जवळपास सर्वच पक्षांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अारक्षित जमिनी पालिकेच्या ताब्यात येऊ शकल्या नाहीत.

कालांतराने महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार अर्थातच एमअारटीपी अॅक्टप्रमाणे १० वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्यास जमीनमालकाला जागा परत मिळविण्याचा मार्ग माेकळा असल्याने त्यासाठी अर्ज करण्याची प्रकरणे वाढू लागली. सद्यस्थितीत महापालिकेसमाेर माेठा पेच निर्माण झाला असून, नवीन विकास अाराखडा मंजुरीच्या प्रक्रियेत असतानाही २० वर्षांपूर्वीच्या अारक्षणांचा निर्णय झालेला नाही. महापालिका जागा वापरत नाही जमीन मालकाला राेख पैसे वा जागेचा वापरही करता येत नसल्याने मालकी परत मिळवण्यासाठी कायदेशीर हत्यार उपसण्यात अाले अाहे. परिणामी स्थायी समितीवर प्रशासनाने कलम १२७ च्या नाेटिसीचे तब्बल २०३ प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय घेतला अाहे.

महापालिका निवडणूक ताेंडावर असल्यामुळे एवढ्या माेठ्या प्रमाणावर असलेल्या नाेटिसांवर नेमकी काय कारवाई करायची, असा पेच स्थायी समितीसमाेर निर्माण झाला अाहे. मागील काळात नगररचना विभागाने महापालिकेची शिल्लक जवळपास पाचशे अारक्षण संपादित करण्यासाठी नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे हजार काेटींपेक्षा अधिक निधीची गरज असल्याचे निदर्शनास अाणून दिले हाेते. सद्यस्थितीत महापालिकेच्या अंदाजपत्रकात भूसंपादनासाठी जेमतेम १२५ काेटी रुपयांची तरतूद अाहे. अशा परिस्थितीत नाेटिसांप्रमाणे जमिनी ताब्यात घ्यायच्या, तर महापालिकेकडे राेख पैसे नसल्याने टीडीअारशिवाय पर्याय नाही. मात्र, टीडीअार धाेरणच वादात असल्याने त्याचाही स्वीकार काेणी करेल, असे दिसत नाही.

दुसरीकडे टीडीअार हा पर्याय एेच्छिक आहे. परिणामी त्याची सक्ती करून भूसंपादनाचा मार्गदेखील उपलब्ध नाही. अशा बिकट परिस्थितीत महापालिकेसमाेर सध्यातरी अारक्षणावर पाणी साेडण्याशिवाय अन्य पर्यायच उरला नसल्याचे बाेलले जात अाहे. तसे झालेच, तर मात्र आरक्षित भूखंड हातचे जाऊन त्याचा विकासावर परिणाम होईल.

अारक्षित जमिनींतून काेणाचे चांगभले?
सर्वसामान्यांच्या जमिनींवर विकास अाराखड्यातून अारक्षण पडल्यानंतर १०-१० वर्षे त्या जमिनी संपादित करायच्या नाहीत आणि राेख पैसेही द्यायचे नाहीत, अशा परिस्थितीत संबंधित जमीन मालकाकडून अशा जमिनी स्वस्तात पदरात पाडून घेणारी एक माेठी लाॅबी नाशिकमध्ये कार्यरत असल्याचे लपून राहिलेले नाही. अाजघडीला अनेक जमिनींचे मुखत्यारपत्राद्वारे अधिकार मालकी हक्क या लाॅबीने स्वतःच्या पदरात पाडून घेतले अाहेत. त्यांना लाेकप्रतिनिधींची साथ लाभल्याचे दिसून अाले. परिणामी अाता जमिनी परत मिळणार असल्या तरी मूळ मालकाचा फारसा संबंध उरलेला नाही. दुसरीकडे, अाता नियमानुसार १० वर्षांपेक्षा अधिक काळ झाल्यामुळे अारक्षित जमिनी परत करण्याचा कायदेशीर मार्ग उपलब्ध अाहे. या सर्वात विकास अाराखड्यात भरमसाठ अारक्षण टाकून संपादनासाठी आर्थिक तजवीज करणाऱ्या तत्कालीन मुखंडांबराेबरच गेल्या २० वर्षांत पालिकेची सत्ता भाेगणाऱ्या जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या उदासीनतेचा फटका नाशिकच्या विकासाला बसणार असल्याचे दिसते अाहे.

दूरदृष्टीहीन धाेरणाचा परिणाम
^अाजघडीला पालिकेसमाेर"करा नाही तर मरा' अशी परिस्थिती अाहे. पैसे नसल्याने अारक्षण व्यपगत हाेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विकास अाराखडा करताना अारक्षणाचा पाऊस पाडण्यापेक्षा संपादनासाठी निधी अन्य पर्याय कसे उपलब्ध हाेतील, याबाबत दूरदृष्टी ठेवून धाेरणच अाखले गेले नाही. त्याचा हा परिणाम अाहे. - माेहन रानडे, निवृत्त अभियंता, महापालिका तथा नगररचना तज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...