आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सौभाग्याचे लेणे' सोडवण्यासाठी आपद्ग्रस्तांची २१ हजारांची मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव (जि. नाशिक) - द्राक्षबागेसाठी गहाण ठेवलेल्या महिलेचे मंगळसूत्र सोडवण्यासाठी निफाड तालुक्यातील रुई, देवगाव व धानोरे येथील गारपीटग्रस्तांनी तब्बल २१ हजार रुपये गोळा करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केले.
दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील सारिका बाळासाहेब वाघ या गृहिणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर द्राक्षबागेकरिता मंगळसूत्र गहाण ठेवल्याचे सांगितले होते. त्यानंतर रुई परिसरातील नुकसानीच्या पाहणी दौ-यावर असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपण शेतकरी कुटुंबातील असल्याने त्या महिलेला मदत करणे आपले आद्य कर्तव्य असल्याचे सांगून आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते.

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रुई, देवगाव व धानोरे येथील शेतक-यांनी पैसे गोळा करीत तब्बल २१ हजार रुपये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ताब्यात दिले. गारपिटीचा तडाखा बसलेल्या शेतक-यांनी दुस-या तालुक्यातील गारपीटग्रस्तांना केलेल्या या मदतीची चर्चा दिवसभर शहर व परिसरात होती.