आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे विक्रमी २२१ रुग्ण, अातापर्यंत ६४० डेंग्यूचे रुग्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘स्वच्छसुंदर नाशिक’चा डंका पिटणाऱ्या महापालिकेच्या अाराेग्य विभागाने काेट्यवधी रुपयांचा सफाईचा ठेका दिल्यानंतरही डेंग्यूवर नियंत्रण काही केल्या मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र असून, इतिहासात प्रथमच डेंग्यूचे एकाच महिन्यात २२१ रुग्ण अाढळण्याची घटना सप्टेंबर महिन्यात घडली अाहे. नऊ महिन्यांत डेंग्यूचे ६४० रुग्ण अाढळले अाहेत.
शहरात तीन महिन्यांपासून डेंग्यूने हैदाेस घातला असून, वारंवार प्रयत्न केल्यानंतरही डेंग्यूवर पालिकेला नियंत्रणच मिळवता अालेले नाही. डेंग्यूबाबत कागदाेपत्री जागृती हाेत असल्याचा नगरसेवकांचा अाराेप असून, एकूणच परिस्थिती लक्षात घेता त्यात तथ्य असल्याचेच िचत्र अाहे. दरम्यान, डेंग्यूचे सप्टेंबर महिन्यात ६१९ डेंग्यूचे संशयित हाेते. या सर्वांचे रक्तनमुने अहवाल तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठवण्यात अाले. त्यापैकी २२१ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात महापालिका क्षेत्रात १७५ रुग्ण, तर बाह्य भागातील ४६ रुग्ण असल्याचे सांगितले जाते. ऑगस्टमध्ये डेंग्यूचे सर्वाधिक १८७ रुग्ण आढळले होते. मात्र, सप्टेंबर महिन्यामध्ये शहरात डेंग्यूचे विक्रमी रुग्ण अाढळल्यामुळे एकप्रकारे महापालिकेचे काम नेमके कसे चालले, यावर चांगलाच प्रकाश पडला अाहे.

या वर्षात शहरात डेंग्यूचा हैदाेस
जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१६ या नऊ महिन्यांच्या कालावधीतच डेंग्यूचे १६३२ संशयित अाढळले अाहेत. त्यापैकी ६४० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, हा अाकडा नऊ महिन्यांचा असून, अद्याप तीन महिने बाकी अाहेत. २०१४ मध्ये डेंग्यूचे ४६१ रुग्ण आढळले होते. त्यामुळे डेंग्यूने यंदा हैदाेस घातल्याचे स्पष्ट हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...