आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ६८ केंद्रांवर २३ हजार परीक्षार्थी देणार ‘टेट’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्राथमिक उच्च प्राथमिक स्तरावर अध्यापन करू इच्छिणाऱ्या भावी शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे अनिवार्य करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टेट) शनिवारी (दि. १६) होणार अाहे. शहरातील ६८ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून, जिल्ह्यातील २३ हजार १७७ परीक्षार्थी प्रविष्ट राहतील. पाच घटकांवर आधारित असलेल्या टेट परीक्षेतील काठिन्य पातळीवर मात करण्यासाठी परीक्षार्थींनी बाजारातील खासगी प्रकाशकांच्या पुस्तकांवर अवलंबून राहता क्रमिक पुस्तकांचा आधार असणार आहे.

शिक्षक होण्यासाठी बंधनकारक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा १६ जानेवारी रोजी होणार आहे. विद्या परिषदेतर्फे टेट परीक्षेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, राज्यभरात एक हजार ७६ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातून २३ हजार १७७ परीक्षार्थी प्रविष्ट राहणार आहेत. परीक्षेसाठी शहरात एकूण ६८ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, पेपर साठी ३९ तर पेपर साठी २९ केंद्रांची व्यवस्था केली आहे. पेपर (पहिली ते पाचवीसाठी) सकाळी १०.३० ते वाजता तर पेपर (सहावी ते आठवीसाठी) दुपारी ते ४.३० या वेळेत होईल. परीक्षेचे नियोजन पूर्ण झाले असून, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या दोन भरारी पथकांसह निरंतर शिक्षण अधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्याही प्रत्येकी एका भरारी पथकाची परीक्षेवर नजर असेल. परीक्षेसाठी ६८ सहायक पर्यवेक्षक, १७ झोनल अधिकारी यांची व्यवस्था असेल.

सव्वातीन लाख परीक्षार्थी
शिक्षक पात्रता परीक्षेसाठी संपूर्ण राज्यभरात तीन लाख २६ हजार परीक्षार्थी प्रविष्ट राहणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्या परिषदेतर्फे एकूण एक हजार ७६ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक शहरातील सर्वच ६८ केंद्रावर या परीक्षेसाठी प्रशासनाच्या वतीने माेठ्या प्रमाणात तयारी करण्यात अालेली अाहे.
पुढे ... ..अशी होईल परीक्षा
बातम्या आणखी आहेत...