आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2500 उद्योगांना बोअरवेलचा हात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश औद्योगिक वसाहतींकडून बोअरवेल खोदण्याबाबतची मागणी एमआयडीसीने मान्य केली असल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. 31 जुलै 2013 पर्यंतच या निर्णयाचा फायदा उद्योगांना घेता येणार आहे. कायमस्वरूपी वापरायच्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील 2500 उद्योगांना याचा फायदा होणार आहे.

पाणीटंचाईची झळ औरंगाबादसारख्या काही शहरांतील औद्योगिक वसाहतींना बसली आहे. नाशिकमध्ये मात्र सध्या उद्योगांना तेवढी तीव्र टंचाई जाणवत नसली तरी शनिवारी पाणीपुरवठा बंद असतो. त्यामुळे किमान 20 टक्के पाणी बचत एमआयडीसीकडून साधली जात आहे. राज्यात उद्योजकांनी आपल्या औद्योगिक भूखंडामध्ये पाण्याचे पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पिण्याच्या पाण्याच्या वापरासाठी बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानुसार काही अटींवर ही मान्यता देण्यात येत आहे.


अशी मिळणार मान्यता
> एका भूखंडासाठी एकच बोअरवेल खोदण्यास परवानगी
> 500 ते 5000 वर्ग मीटरच्या भूखंडासाठी वैयक्तिक परवानगी नाही (किमान 2.5 हेक्टरच्या संयुक्त भूखंडासाठी परवानगी)
> बोअरवेलसाठी एमआयडीसीकडे करावा लागणार अर्ज
> 60 मीटरपर्यंत बोअरवेल खोदता येणार असून, त्यापेक्षा जास्त खोलीसाठी जिल्हाधिकार्‍यांची परवानगी गरजेची


स्वस्त पाणी मिळणार
सध्या एमआयडीसीच्या पिण्याच्या पाण्याचा दर एक हजार लिटरसाठी 18 रुपये मोजावा लागतो. बोअरवेलसाठी एकदाच खर्च करावा लागणार असून पिण्याच्या आणि वापरायच्या पाण्यावरचा खर्च काही अंशी कमी होऊ शकेल. मनीष कोठारी, उपाध्यक्ष, निमा