आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11-12-13 च्या मुहूर्तावर 26 बालकांचा नैसर्गिक प्रसुतीने जन्म

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आपले बाळ विशिष्ट मुहूर्तावर जन्माला यावे, अशी बहुतांश लोकांची इच्छा असते. मग तो मुहूर्त 11-12-13 चा का असेना. तब्बल शंभर वर्षांनी येणार्‍या या अनोख्या मुहूर्तावर शहराच्या विविध रुग्णालयांमध्ये सुमारे 26 चिमुकल्यांनी बुधवारी जन्म घेतला.
बुधवारी मोरवाडी येथील महापालिकेच्या स्वामी सर्मथ रुग्णालयात शिला पवार यांनी दोन कन्यांना जन्म दिल्याने त्यांच्या घरी आनंदाचे वातावरण होते. ललिता सोनवणे यांनाही या मुहूर्तावर कन्यारत्नाची भेट मिळाली. मुहूर्तासाठी कुठलाही कृत्रिम प्रयत्न केला नसून, दोन्ही महिलांची नैसर्गिक आणि सुखरूप प्रसुती झाली. जेडीसी बिटको हॉस्पिटलमध्येही नऊ प्रसुती झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. सातपूर येथील मायको प्रसुतिगृह, पंडित कॉलनी येथील शिवदे हॉस्पिटल येथेही या मुहूर्तावर बाळांनी जन्म घेतला. बुधवारी बारा वाजेच्या मुहूर्तासाठी शस्त्रक्रियेचा आग्रह कुठल्याही कुंटुबीयांनी केला नसल्याचे या रुग्णालयांनी सांगितले.
शासकीय रुग्णालयात 12 चिमुकल्यांचा जन्म
जिल्हा शासकीय रुग्णालयात 11-12-13 या तारखेसा तब्बल 12 चिमुकल्यांचा जन्म घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.