आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात 27 गुंडांवर तडिपारीची कारवाई, गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी पाऊल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात 12 तासांच्या आत झालेल्या दोन हत्या आणि हल्ल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी तातडीने कारवाई करून 27 गुन्हेगारांची तात्पुरती तडिपारी केली आहे.

पंचवटीतील तलाठी कॉलनीत बंगल्यात घुसून झालेली एकाची हत्या, पैसे देण्याच्या वादातून हॉटेल व्यवस्थापकाची हत्या आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पोलिस निरीक्षकाच्या मुलास झालेल्या मारहाणीच्या घटनांनी संपूर्ण शहर हादरले होते. एकाच दिवसात दोघांची हत्या होण्याच्या प्रकाराने महानगरातील पोलिसांच्या कायदा-सुव्यवस्थेलाच एकप्रकारे आव्हान दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीची उपाययोजना म्हणूनच गुन्हेगारी
नाशकात 27 गुंडांवर तडिपारीची कारवाई पार्श्वभूमी असलेल्या 27 गुंडांवर ही तात्पुरती तडिपारीची कारवाई केली आहे.


पोलिसठाणेनिहाय स्थिती- भद्रकालीतून 11, सरकारवाडा 8, अंबड 5, आडगाव 5, सातपूर 7, नाशिकरोड 1 आणि उपनगर पोलिस ठाण्यातून 3 इतक्या गुंडांवर तात्पुरत्या तडिपारीच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यातील एकूण 27 गुंडांवर तात्पुरती तडिपारीची कारवाई करण्यात आली असून, अन्य गुन्हेगारांवरही मान्यता मिळाल्यानंतर तात्पुरती तडिपारीची कारवाई केली जाणार आहे. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त संदीप दिवाण, सहायक आयुक्त पंकज डहाणे यांनी ही धडक कारवाई केली.