आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: देवळाली कॅम्पमध्ये कचराकुंडीत सापडले हॅण्डग्रेनेड-काडतुसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - देवळाली कॅम्प परिसरात शनिवारी कचराकुंडीत सापडलेल्या दोन जिवंत बॉम्ब आणि काडतुसांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे लष्करी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मात्र रविवारी सायंकाळपर्यंत याप्रकरणी कोणतीही तक्रार नोंदविण्यात आलेली नव्हती. हॅण्डग्रेनेड सापडलेल्या परिसरातील सोसायटीतील नागरिकांची लष्करी अधिकारी आणि पोलिस हे कसून चौकशी करीत आहेत.

देवळाली कॅम्प आणि भगूर परिसरात लष्करी कर्मचार्‍यांचा वावर असतो. या ठिकाणी स्थानिक रहिवासी राहत असल्याने या भाग कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ताब्यात आहे. शनिवारी बोर्डाचे कर्मचारी कचराकुंडीतील कचरा घेण्यासाठी गेले असता, त्यांना बॉम्ब आणि काडतुसे त्या ठिकाणी आढळली. ही बातमी परिसरात वार्‍यासारखी पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. रविवारी येथील बाजारात गर्दीही कमी होती.

तपास सुरू
पोलिस आणि लष्करी अधिकारी यांचा संयुक्त तपास सुरू आहे. हॅण्डग्रेनेड निकामी करण्यात आले असून, ते चौकशीसाठी पोलिस ठाण्यातच ठेवण्यात आले आहे. किशोर सूर्यवंशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक