आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उधळपट्टी: चांगला रस्ता खोदून पुन्हा काँक्रिटीकरण, तब्बल 3 कोटींचा होतोय खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दहा वर्षांपूर्वी काँक्रिटीकरण केलेला चांगला रस्ता खोदून तेथे पुन्हा काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याचा प्रकार पंचवटीत समोर आला आहे. या रस्त्यासाठी तब्बल तीन कोटींपर्यंत खर्च केला जाणार आहे.
पंचवटीतील तपोवन कॉर्नरपासून पंचमुखी हनुमान मंदिरादरम्यान असलेल्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी यापूर्वी सुमारे २० लाखांपर्यंत खर्च करण्यात आला होता. काँक्रिटीकरणाच्या निकषाप्रमाणे एकदा तयार केलेल्या रस्त्याची साधारणपणे २० वर्षे डागडुजीही करण्याची गरज भासत नाही. किंबहुना, डागडुजीचा खर्च वाचत असल्यामुळेच काँक्रिटीकरणाच्या कामांना प्राधान्य दिले जाते. परंतु, या निकषाकडे सर्रास डोळेझाक करत सुस्थितीत असलेला हा रस्ता खोदून त्यावर पुन्हा काँक्रिटीकरण करण्याचा उद्योग महानगरपालिकेकडून केला जातो आहे.
एकाच रस्त्यावर एवढा खर्च करण्यापूर्वी पंचवटीतील नववसाहतींमधील प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांकडे मात्र पालिकेकडून सोयीस्कर डोळेझाक होते आहे.
काँक्रिटीकरण नव्हे, केवळ सिमेंटचा थर
या रस्त्याचे काँक्रिटीकरण नव्हे, तर केवळ व्हाइट टॉपिंग करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले. रस्त्यावर केवळ चार इंचाचा सिमेंटचा थर देण्यात येत असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केबल टाकण्यात येत आहे. हा शाहीमार्ग असून, त्यावरून लाखो भाविक साधू मार्गक्रमण करणार असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून हा थर टाकण्यात येत आहे, असेही महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...