आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीवर जात हाेते पाच जण; टॅंकरच्या धडकेने तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड- दुचाकीवर जाणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जणांना भरधाव टॅंकरने जाेराची धडक दिली. यात दांपत्यासह पुतण्याचा मृत्यू झाला तर  इतर दाेघे जखमी झाले. साेमवारी दुपारी मालेगाव-मनमाड राज्यमार्गावर दहेगाव शिवारात हा अपघात झाला. जखमींना तातडीने मालेगावच्या रुग्णालयात हलविण्यात अाले.


संतोष रामभाऊ चितळकर (वय ३५), आशाबाई संतोष चितळकर (वय ३०) व भूषण उत्तम चितोळकर (वय १०,  सर्व रा.बोयेगाव, ता.नांदगाव) अशी मृतांची नावे अाहेत. तर सविता उत्तम चितळकर (वय ४०) अाणि रोशन संतोष चितळकर (वय ७) हे गंभीर जखमी झाले. 
चितळकर परिवारातील हे पाच सदस्य दुचाकीवरुन मनमाडकडे येत हाेते. त्याच वेळी टॅंकरने त्यांच्या गाडीला धडक दिली. तुकाराम गंगा चितळकर हा टॅंकर चालवत होता, अशी माहिती अाहे. दरम्यान, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. टॅंकरचालक व मयत परिवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीचा वाद सुरु आहे. हे प्रकरण काेर्टात अाहे. याच वादातून हा घातपात घडविण्यात आल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...