आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोरुग्णाकडून आजोबासह दोघांवर कुऱ्हाडीचा हल्ला, तिघांचा जागेवरच मृत्यू; पत्नी 7 महिन्यांची गरोदर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदगाव- "दोम दोम दावल शा बाबा" अशा त्वेषाने घोषणा देत मानसिक संतुलन बिघडलेल्या रवींद्र पोपट बागुल (वय-28) याने हिंगणे (ता.नांदगाव) येथील पंचशील नगर वसाहतीत कुऱ्हाडीने चढविलेल्या हल्यात स्वतःच्या आजोबासह रस्त्याने जाणाऱ्या दोन नागरिकांची निर्घृण हत्या केली.

हातात कुऱ्हाड घेऊन दिसेल त्याच्या डोक्यात घाव घालत सुटलेल्या माथेफिरु मारेकऱ्याच्या तावडीतुन दोन जणांनी जीव मुठीत धरुन पळ काढला.परिसरातील युवकांनी धाडस दाखवत मारेकऱ्याला पकडले अन्यथा रहदारी असलेल्या या भागात आणखी काही जणांना आपले प्राण गमवावे लागले असते. नांदगाव पोलिसांनी घटनास्थळावरुन संशयिताला ताब्यात घेतले.
 
मरेकऱ्याचा भाऊ प्रविण बागुल याने दिलेल्या माहिती अशी की, रवींद्र भिवंडी येथे खासगी कंपनीच्या आयशर वाहनावर चालक होता व तो स्वतः चालक म्हणून अन्यत्र काम करत होते.  रवींद्र त्याची पत्नी आणि मी तिघे तेथेच वास्तव्यास होतो. मागच्या आठवड्यात आम्ही सात महिन्याची गरोदर असलेल्या त्याच्या पत्नीला घेऊन नांदगाव तालुक्यातील आमच्या मुळ गावी हिंगणे येथे आई आणि आजोबांकडे आलो. हिंगण्याला आल्यावर रवींद्र वेड्यासारखा करायचा म्हणुन आम्ही त्याला गुजरात येथिल एका खेड्यात मांत्रिकाकडे घेऊन गेलो होतो. तेथून गावी परतल्यावर सोमवारी संध्याकाळी तो पुन्हा वेड्यासारखा करायला लागला व त्वेषाने 'दोम दोम दावल शा बाबा' अशा आरोळ्या ठोकायचा. काका भावराव त्याला समजवयला गेले असता त्याने काकांना जोरदार लाथ मारली लाथेचा तडाखा एवढा जबरदस्त होता की काका लांब जाऊन पडले. त्यानंतर, कशीबशी त्याची समजूत काढल्यावर आम्ही दोघे भाऊ कांकाच्या घरी झोपी गेलो.

सकाळी साडेसहा वाजता भावाच्या किंचाळण्याने झोप उघडली तो पुन्हा वेड्यासारखा करत पळत सुटला होता मी पण त्याच्यामागे पळत होतो. पळत पळत तो आमच्या स्वतःच्या घरी येऊन पलंगावर बसला मिही त्याच्यापाठीमागे घरात आलो व तु असे का करत आहे असे त्याला विचारले पण त्याने काहीही उत्तर दिले नाही थोड्यावेळाने पुन्हा दोम दोम दावल शा बाबा आरोळ्या ठोकत घरात कोपऱ्यात पडलेली कुऱ्हाड त्याने उचलली व अंगणात उभे असलेले आजोबा  केशव कचरु बागुल वय ६५ यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातला. कोसळून खाली पडलेल्या आजोबावर त्याने पुन्हा पुन्हा घाव घातले. मी त्याला अडवायला गेल्यावर तो कुऱ्हाड घेऊन माझ्या मागे लागला मी शेजारच्या घरात लपलो व आतुन दार बंद करुन घेतले तो हातात कुऱ्हाड घेऊन काहीवेळ दरवाजासमोर उभा होता. त्याचा रुद्रावतार पाहुन पंचशील नगर मधल्या सर्व रहिवाशांनी आपआपली घरे बंद करुन घेतली होती. अशी माहिती प्रविण याने दिली.

रवींद्र हा तांड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर आला रस्त्यावर दुचाकीने जाणारे सुभाष भिमाजी बच्छाव (वय-50)यांच्या डोक्यात त्याने कुऱ्हाडीचा घाव घातला. ते जागेवर रक्ताच्या थारोळ्यात पडले. थोडे पुढे जात त्याने हातात विळा घेऊन शेतावर कामासाठी निघालेले वृद्ध विक्रम मंगु पवार (वय-60) यांच्या डोक्यात कुऱ्हाड घातली. तेही रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. यादरम्यान तो आणखी दोन अनोळखी इसमांच्या मागे लागला होता पण त्यांनी कसाबसा पळ काढला. एव्हाना हातात कुऱ्हाड घेऊन वार करत सुटलेल्या माथेफिरु मारेकऱ्याची माहिती परिसरात पसरली. काही धाडसी तरुणांनी त्याला पकडून येथेच्छ चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी घटनास्थळावरुन हल्यात वापरली गेलेली कुऱ्हाड जप्त केली. पोलिस उपाधिक्षक डॉक्टर राहुल खाडे यांनी तपासा संबधी सुचना केल्या. खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांत सुरू होते मृतांवर नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. हत्याकांडाचा सर्व शक्यतांचा तपास केला जाईल असे पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी सांगितले.

पत्नी सात महिन्यांची गरोदर...
- मानसिक संतुलन ढासळलेला रवींद्रचा तीन वर्षांपूर्वी कंडारी (ता. भुसावळ) येथील तरुणीसोबत विवाह झाला होता.
- भिवंडी येथे  रवींद्र आणि प्रविण सोबत राहात होते. पत्नी विद्या सात महिन्यांची गरोदर आहे.
- त्याचे वडील वारलेले आहेत मुळ गावी हिंगणे येथे आई व आजोबा शेती करतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... घटनेची भीषणता दर्शवणारे फोटो...
बातम्या आणखी आहेत...