आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनशे काेटींचा अपहार; ‘एचअाेअाय’विरुद्ध तक्रार, संतप्त गुंतवणूकदारांनी केली कार्यालयाची ताेडफाेड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- केबीसी,मैत्रेय या दोन घोटाळ्यानंतर आणखी एक महाघोटाळा उघडकीस आला आहे. हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट्स कंपनीच्या (एचअाेअाय) संचालकांनी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे हजार गुंतवणूकदारांना रिअल इस्टेट आणि सोन्यामध्ये गुंतवणूक केल्यास मासिक टक्के व्याज देण्याचे अामिष दाखवत सुमारे तीनशे कोटींचा अपहार केल्याची तक्रार गुंतवणूकदारांनी पोलिसांत शुक्रवारी (दि. १७) केली.

कंपनीच्या संचालकांनी गाशा गुंडाळल्याने संतप्त गुंतवणूकदारांनी गंगापूररोडवरील कंपनीच्या कार्यालयावर रोष व्यक्त करत या कार्यालयाच्या काचा फोडल्या. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरू होते. गंुतवणूकदारांच्या तक्रारीनुसार एचओआय कंपनीमध्ये पोर्टफोलिअो मॅनेजमेंट सर्व्हिस या याेजनेत गुंतवणूक केल्यास मासिक दोन टक्के व्याजदराने परतावा देण्याचे अामिष दाखवले हाेते. शेअर बाजार, परदेशातील सोने-चांदी व्यवहार आणि रिअल इस्टेट, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ड्रॅगन पार्क व्यावसायिक संकुल अशा विविध याेजनात गुंतवणूक केल्यास दरमहा १६ ते १७ टक्के परतावा देण्याचे अामिष कंपनीने दाखवले हाेते.
सुरुवातीला सात महिने गुंतवणूकदारांना परतावा मिळत होता. मात्र मागील दोन महिन्यापासून कंपनीचे संचालक विनोद पाटील, सुशांत कोठुळे यांच्यासह ३० ते ४० एजंटकडून पैसे देण्यास टाळाटाळ होत होती. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. तपास सुरु असतांना संशयित संचालकांकडून गुंतवणूकदारांना धमकीसत्र सुरू झाले.
शुक्रवारी संचालकांकडून नवीन कार्यालयाची सुरुवात करण्यासाठी सर्व गुंतवणूकदारांना अामंत्रित केले होते. संचालकांकडून फसवणूक झाल्याने संतप्त गुंतवणूकदारांनी गंगापूररोडवरील हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट कार्यालयावर जमा झाले. काही गुंतवणूकदारांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या. रात्री उशिरापर्यंत कार्यालयाबाहेर हा गोंधळ सुरू असूनही गंगापूर पोलिसांनी या गोंधळाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला.

राजकीयवरदहस्त : संचालकपाटील हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका संचालकाचे जावई आहेत. या ओळखीतून काही शेतकऱ्यांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली असल्याने फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दखलनाही :हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या अपहाराची गुंतवणूकदारांनी १६ मे राेजी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेशीत केले होते. मात्र कारवाई करण्यास विलंब झाल्याने गुंतवणूकदारांचा संयम सुटला.

संचालकांकडून धमकी
गुंतवणूकदारांचे पैसे कधी परत करणार याकरिता संचालकांकडे तगादा लावला जात असल्याने संचालकांच्या माणसांकडून गुंतवणूकदारांना धमकीसत्र सुरू होते. पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. - गणेश काठे, गुंतवणूकदार

व्यावसायिक गाळ्यांचे अामिष
कंपनीकडून पेठरोड येथील शरदचंद्र मार्केट येथे वर्ल्ड ट्रेड सेंटर ड्रॅगन पार्क असे दोन व्यावसायिक संकुल बांधण्यात येत अाहेत. येथे २५० गाळे आहेत. या गाळ्यांची आगाऊ बुकिंग झाली. मात्र ताबा मिळालेला नसल्याने गंुंतवणूक रकमेवर दरमहा व्याज देण्याचे अामिष दाखवण्यात आले होते.- दिनेश खैरे, गुंतवणूकदार

कोट्यवधींचा अपहार
^कंपनीच्यासंचालकांकडूनविविध याेजनांमध्ये पैसे गुंतवल्यास मासिक टक्के व्याज देण्याचे अामिष देण्यात येत हाेते. सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, शेतकरी यांनीही या कंपनीमध्ये गुंतवणूक केली हाेती. मात्र कंपनीकडून अाता गुंतवणूकदारांना पैसे देण्यास टाळाटाळ होत आहे.- तुषार जगताप, गुंतवणूकदार
गुंतवणूकदारांना परताव्यासह सर्व पैसे परत करण्याचा अाराखडा पाेलिस अायुक्तांना सादर केला अाहे. यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरू नये. - विनाेद पाटील, चेअरमन,हाऊस अाॅफ इन्व्हेस्टमेंट्स