आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव-सटाणा रस्त्यावर अपघात; टायर फुटल्याने झाडावर आदळली कार, 3 जण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मालेगाव सटाणा मार्गावर एक स्विफ्ट कार झाडावर आदळून भीषण कार अपघात झाला. या अपघातात 2 वृद्धांचा जागीच मृत्यू झाला. तर यात गंभीर जखमी झालेल्या एका बालिकेची प्राणज्योत उपचारादरम्यान मालावली. डॉ. रामराव आहेर यांचे वाहन मालेगाववरून देवळाकडे जाताना झाडाला आदळून हा अपघात घडला आहे. 
 
सटाणा जवळील अराई फाटा येथे दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यातील जखमींची नावे नावे अद्याप समोर आलेली नाहीत. सटाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट मोटार (एमएच४१ व्ही ३७२१) ब्राम्हणगावाकडून सटाण्याकडे जात होती. यावेळी चाकाचे घर्षण होऊन आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे पुढील टायर फूटल्याने अराई फाट्याजवळ वाहनचालकाचे नियंत्रण सुटले. आणि कार तेथील झाडावर जाऊन आदळली. या अपघातात विजय गोविंद जाधव (६२ रा. सातमाने ), रामराव वामन आहेर (६५ रा. देवळा) आणि गौरी गोविंद निकम (१३) यांचा मृत्यू झाला. यासोबतच वाहनचालकासह वाहनचालकासह इतर काही प्रवासी जखमी झाले. जखमींवर उपचारप सुरू असून सटाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...