आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यात तीन महिलांना ‘स्वाइन फ्लू’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- उन्हाचा कडाका वाढत असतानाच जिल्ह्यात स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसात जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या संशयित रुग्णांची संख्या सातवर पोहोचली असून, त्यातील तिघांना स्वाइनची लागण झाल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले आहे.

शनिवारी दिवसभरात पाच आणि रविवारी सायंकाळपर्यंत दोन असे एकूण सात रुग्ण जिल्हा रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात दाखल झाले होते. यातील पाच रुग्णांचे घशातील स्त्राव पुणे येथील राष्‍ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवले होते. तपासणी अहवालात तीन महिलांना स्वाइन फ्लू निष्पन्न झाला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, उर्वरित दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.
रुग्णांमध्ये महिला अधिक

सात संशयितांमध्ये पाच महिलांचा समावेश असून, स्वाइन फ्लू निष्पन्न झालेल्या तीनही महिला असल्याचे समोर आले आहे. यापैकी दोघी बागलाण तालुक्यातील व एक महिला गंगापूररोड भागातील आहे.