आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट रसिकांची काॅम्बाे पॅकने लूट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिवाळीच्या सुटीत तब्बल तीन चांगले चित्रपट झळकल्याने रसिकांनी सुटीतील दाेन-एक दिवस चित्रपट पाहण्यातच घालवले. मात्र प्रत्येक थिएटरवर रसिकांना काॅम्बाे पॅकने अक्षरशा लुटले. तिकीटदरापेक्षा ५० ते १०० रुपये अधिक माेजावे लागल्याने प्रत्येक थिएटरवर वाद होत हाेते. काही ठिकाणी अाेळखीच्या वा शहरातील मान्यवरांना अाहे त्याच दरात तिकीट खिडकीवरच तिकीट दिले जात असल्याने या संतापात अधिक भर पडत हाेती.

दिवाळीची शनिवार ते शनिवार अशी अाठ दिवस सुटी मिळाल्याने अनेकांनी चित्रपटाचा अानंद घेतला. ‘प्रेम रतन धन पायाे’, ‘कट्यार काळजात घुसली’ अाणि ‘मुंबई-पुणे-मुंबई टू’ असे तीन दमदार चित्रपट प्रदर्शित झाले. त्यात सलमानचा प्रेम रतन अाणि सचिन पिळगावकर यांचा कट्यार... हे चित्रपट विशेष अाकर्षण हाेते. त्यामुळे तरुणांसह ज्येष्ठांचीही मल्टीप्लेक्समध्ये गर्दी झाली. पण जनरल तिकीट देता काॅम्बाे पॅकच बळजबरी दिले जात हाेते. याचे छापील तिकीट नव्हते, तर कार्ड तिकिटावर शिक्का मारून दिला जात हाेता. ११० रुपयांचे तिकीट १६० रुपयांना बळजबरी दिले जात हाेते. त्यामुळे तिकीट खिडकीवर वाद झाले. लांब रांगेला पुढे काय सुरू अाहे हेच कळत नसल्याने ‘लवकर अावरा’, ‘पिक्चर सुरू झाला’ असा गाेंधळ हाेता ताे वेगळाच.

अनेक चित्रपटांचे अाॅनलाइन बुकिंग फुल्ल दिसत हाेते. प्रत्यक्षात मात्र थिएटरमध्ये बरेच सीट रिकामे हाेते. अाॅनलाइन तिकिटे बुक केलेल्यांना मात्र जनरल दरातच तिकिटे मिळत हाेती. प्रत्यक्षात खिडकीवर तिकिटासाठी गेलेल्यांना काॅम्बाेपॅकचे पैसे माेजावे लागत हाेते. यामुळे अनेकांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला, तर ‘जाऊ द्या दिवाळी अाहे’ असे म्हणत काहींनी दुर्लक्ष करून तिकीट घेऊन चित्रपट पाहिला.

अाम्ही परत अालाे
^अाम्ही दहावी अकरावीचे विद्यार्थी. मित्र एकत्रितपणे पिक्चरला अालाे हाेताे. पालकांनी माेजकेच पैसे दिलेले. अाता इथे ‘काॅम्बाे पॅकच घ्या’ असे हे लाेक सांगताहेत. पण अामच्याकडे एवढे पैसेच नाही. त्यामुळे अाम्ही चित्रपट बघताच परत घरी जायला निघालाे अाहाेत. देदीप्य रानडे, विद्यार्थी

उगीचच हाउसफुल्ल
^अाॅनलाइन बुकिंगसाठी प्रयत्न करत अाहाेत. मात्र, सर्वच मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट हाउसफुल्ल दाखवले जात हाेते. खिडकीवर माेठ्या कष्टाने तिकीट मिळाले, पण काॅम्बाे पॅकची बळजबरी करण्यात अाली. प्रत्यक्षात बरेच सिटी रिकामेच हाेते. ही फसवणूक फक्त लूट करण्यासाठीच अाहे. सुमित सूर्यवंशी, चित्रपट रसिक