आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याचा उच्छाद: 10 ठिकाणी पिंजरे लावण्याचे नियाेजन; वनविभागाकडून 3 शार्प शूटर तैनात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरखेडा येथे कॅमेऱ्यात कैद झालेला नरभक्षक बिबट्या. - Divya Marathi
वरखेडा येथे कॅमेऱ्यात कैद झालेला नरभक्षक बिबट्या.

मालेगाव- चाळीसगाव मालेगाव तालुक्यात धुमाकूळ घालून सात जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गाेळ्या घालण्याचे अादेश देण्यात अाले अाहे. यासाठी वनविभागाने तीन शार्प शूटर तैनात करून दहा ठिकाणी पिंजरे बसविण्याचे नियाेजन केले अाहे. दरम्यान, बुधवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुणाल अहिरे या बालकावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात अाले.


चाळीसगाव तालुका शिवारात चार महिन्यांत सात नरबळी पंधरा जनावरे ठार करणाऱ्या बिबट्याने अयशस्वी हल्ल्यात सहा महिलांना जखमी केले अाहे. वनविभागाने जंग जंग पछाडूनही दाद देणारा बिबट्या अाता मालेगाव तालुका शिवारात अाला अाहे.

 

अाॅगस्ट २०१७ पासून नरभक्षक बिबट्याने चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव, उपखेड, पिलखाेड, वरखेडे, पिंगळगाव शिवारात दहशत निर्माण केली अाहे. जनावरांवर हल्ले करतानाच बिबट्याने शेतकरी शेतमजुरांवरदेखील हल्ले करत सहा जणांचा बळी घेतला अाहे. बिबट्याच्या दहशतीमुळे या गावांच्या शिवारात काम करणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण कायम असताना वनविभागाने पिंजरे लावले, गस्त घातली मात्र बिबट्या वनविभागाच्या हाताला लागलेला नाही. तोंडाला माणसाचे रक्त लागलेल्या बिबट्याने मिळाले तर जनावरे नाहीतर माणसे असे जे मिळेल त्यावर हल्ले केले. नरबळींची वाढती संख्या लक्षात घेता वनविभागाने थेट बिबट्याला गाेळ्या घालण्याचे अादेश दिले. यासाठी शार्प शूटर पाचारण करण्यात अाले हाेते. परंतु बिबट्या मिळालेला नाही. या बिबट्याने चाळीसगाव तालुक्यातील रहिवास गुंडाळत मालेगाव तालुका शिवारात साकूरमार्गे प्रवेश करीत त्याने बालकाचा पहिला बळी घेतला आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, याच झाेपडीपासून बिबट्याने कुणालला फरफटत नेले हाेते...

 

बातम्या आणखी आहेत...