आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएममध्ये ग्राहकांना गंडा घालणारे तीन संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बँकएटीएममध्ये कोणी मदत करण्यासाठी पुढे येत असले तर सतर्क व्हा, अशाप्रकारे एका इसमास मदत करण्याचा बहाणा करत १६ हजारांना गंडा घातल्याचा प्रकार बुधवारी (दि. २) मुंबईनाका परिसरातील एसबीआयच्या एटीएममध्ये उघडकीस आला. मदत करणारे तीन संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. तक्रारदाराने संशयितांची अाेळख पटवली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणीहारुन गमीर शेख (रा. शिवाजी चौक) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मुंबईनाका येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. संशयितांनी शेख यांना बोलण्यात गंुतवून बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगत मदत पाहिजे का, असे विचारत शेख यांच्या एटीएम कार्डचा पासवर्ड नंबर माहिती करून घेत त्यांच्या खात्यातून १६ हजारांची रक्कम काढून घेतली. दोन दिवसांनी शेख यांच्या मोबाइलवर पैसे काढल्याचा मेसेज आला. बुधवारी शेख पुन्हा एटीएममध्ये गेले, मात्र येथे संशयित नसल्याने अापली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबईनाका पोलिस ठाण्यात त्यांनी धाव घेतली. घडलेला प्रकार सांगितल्यानंतर उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ निरीक्षक सुनील नंदवाळकर, उपनिरीक्षक रमेश पवार यांनी एटीएमचे सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले असता तीन संशयित शेख यांच्याशी बोलताना दिसत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी 
एटीएमफसवणुकीचे प्रकार वाढत आहे. कार्डचा नंबर अनोळखी व्यक्तींना देणे टाळावे. संशय वाटल्यास पिन नंबर बदलावा. कार्ड स्वॅप करताना खबरदारी बाळगावी. एटीएममध्ये कार्डचा वापर करताना एटीएमच्या सूचनांचे पालन करावे, जेणेकरून व्यवहार सुरळीत करता येतील. अनोळखी व्यक्तीच्या हातात कार्ड देऊ नये आदी काळजी घेतल्यास फस‌वणूक टाळता येणे शक्य आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...